Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Ahilyanagar Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीसाठी तब्बल ५४१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील समन्वयाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 02:34 PM
बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Follow Us
Follow Us:
  • महायुतीत समन्वयाचा अभाव?
  • जिल्हा बँक निवडणुकीत ५४१ अर्ज
  • राम शिंदेंनी ठोकला शड्डू
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे वरिष्ठ राजकीय नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे वरिष्ठ पातळीवर बिनविरोध निवडणुकीसाठी राजकीय जुळवाजुळव सुरू असताना, दुसरीकडे सभासदांनी तब्बल ५४१ उमेदवारी अर्ज उचलल्याने या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींवरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी थेट नाराजी व्यक्त करत, “सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय असा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो?” असा परखड सवाल उपस्थित केला आहे.

संगमनेरमधील बैठकीवरून राम शिंदेंचा निशाणा

संगमनेर येथे झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना राम शिंदे म्हणाले, माझ्या मनधरणीचा प्रश्नच येत नाही. याबाबत वरिष्ठ नेत्यांनीच स्पष्ट बोलले पाहिजे. संगमनेरमध्ये बैठक झाली आणि त्यात बिनविरोधचा निर्णय झाला असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्ष सभासदांची भूमिका वेगळी आहे. जर बिनविरोधवर एकमत झाले होते, तर मग ५४१ इतक्या मोठ्या प्रमाणात सभासदांनी अर्ज का घेतले?”

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

महायुतीत समन्वयाचा अभाव नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.पालकमंत्र्यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. या बैठकीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. एकीकडे शिवसेना बैठका घेत आहे, तर दुसरीकडे इतर घटक पक्षांना त्याची माहितीच नाही. सर्वांच्या बोलण्यात एकसूत्रता राहिलेली नाही. अशा परिस्थितीत सभापती म्हणून मी तरी काय भूमिका घ्यायची असा सवाल सभापती राम शिंदे यांनी म्हटलंय..

त्यांनी पुढे माहिती दिली की, संगमनेरच्या बैठकीनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख तसेच विवेक कोल्हे यांचा फोन आला होता. मात्र, त्यानंतर या संदर्भात कोणतीही सविस्तर चर्चा किंवा निर्णय झालेला नाही.

सर्व विचारांतीच अर्ज भरण्याचा निर्णय; थकबाकीवर स्पष्टीकरण

तीन अपत्यांच्या नियमावलीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, “सर्व बाबींचा सारासार विचार करूनच मी फॉर्म घेतला आहे आणि तो निश्चितपणे भरला जाईल,” असे सांगत शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या पहिल्या निवडणुकीचे संकेत दिले. तसेच, जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आणि थकबाकी असल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “मी सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नाही. ज्यांच्या कारखान्यावर कर्ज आहे, त्यांनाच त्याबाबत विचारा. अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारीच घेतील.”

बँकेचे हित आणि दुष्काळी परिस्थिती

जिल्हा बँकेचे महत्त्व विशद करताना राम शिंदे म्हणाले की, बँकेचा विस्तार मोठा असून ठेवींची रक्कम अथांग आहे. बँकेचे कामकाज उत्तम सुरू असून ठेवीदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत सरकारने मदत करण्याची तयारी दर्शवली असून, त्याचा मोठा फायदा बँकेला आणि पर्यायाने सभासदांना होईल.

राजकीय पेच वाढणार?

एकीकडे प्रस्थापित नेत्यांकडून बिनविरोध निवडणुकीसाठी गुप्त बैठका आणि हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष सभासदांमधून उमेदवारी अर्ज घेण्याचा ओघ सतत वाढत आहे. यामुळे नेत्यांची इच्छा आणि तळागाळातील सभासदांचा कौल यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत वरिष्ठ नेते कोणता मार्ग काढतात आणि राम शिंदेंची पुढील भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…

Web Title: Ahilyanagar district bank election 541 nomination forms ram shinde mahayuti coordination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bank
  • Election

संबंधित बातम्या

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
1

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
2

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

October Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये अर्धा महिना बँका बंद राहणार? कामाचं नियोजन करण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांचे कॅलेंडर
3

October Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये अर्धा महिना बँका बंद राहणार? कामाचं नियोजन करण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांचे कॅलेंडर

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा
4

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.