
नौदल दिनानिमित्त आयोजित उपक्रमांच्या एक भाग म्हणून आयएनएस शिवाजीत विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले. आकर्षक प्रात्यक्षिके, मरीन इंजिनिअरिंग संग्रहालयाचा दौरा, प्रशिक्षण सुविधांची भेट तसेच नौदलातील करिअरविषयक मार्गदर्शन यांद्वारे विद्यार्थ्यांना नौदलाच्या जीवनशैलीची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरातमधील सैनिक शाळांसह एकूण दहा शाळांनी या उत्सवात सहभाग नोंदविला.
३ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरमच्या शांगुमुघम बीचवर झालेले नेत्रदीपक ऑपरेशनल प्रात्यक्षिक हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या या सादरीकरणात ‘लढाईसाठी सज्ज, एकसंध, विश्वासार्ह आणि आत्मनिर्भर दल’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. आयएनएस शिवाजी येथील सभागृहात कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
Indian Navy : भारतीय नौदल किती आहे सक्षम? शेजारील देशांच्या तुलनेत तयारी किती?