रत्नागिरी : बारसू प्रकल्पावरून (Barsu project) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच (MP Vinayak Raut) ढवळून निघाले आहेत. बारसू प्रकल्पावरून (Refinary project) अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, काल आंदोलन चिघळल्याने अनेक राजकीय नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आज यावेळी उद्योग मंत्री (Industries Minister Uday Samant) यांनी हे प्रकरणाची गंभीर दखल घेत, महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले.
बारासू मध्ये जे स्थानिक शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सर्व शंका दूर करून, त्यांच्याशी चर्चा करूनच प्रकल्प पुढे नेणार.. आंदोलनकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. सरकार तुमच्याबरोबर केंव्हाही चर्चा करायला तयार आहे..
— Uday Samant (@samant_uday) April 28, 2023
बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित : या बैठकीला अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर या प्रकल्पावरून सरकारवर टीकास्त्र सोडणारे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसण केले जाईल, यावर चर्चा झाली. तसेच, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांचे निरसण केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माननीय शरद पवारांनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती पाठवली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनासुद्धा याबाबत सर्व माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत कोणी काही अफवा पसरवत असेल, तर कृपया त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहनसुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
काल बारसूतील आंदोलन चिघळल्यानंतर
तरीही चर्चेसाठी प्रशासन बारसूमध्ये दाखल झाले होते. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी आले होते. मात्र, आंदोलकांनी चर्चेवर बहिष्कार टाकल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी बोलत असताना आंदोलक निघून गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आम्ही चर्चेसाठी कधीही तयार असल्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले होते.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं होतं. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आज सकाळीही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होते. अशातच काही वेळापूर्वी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर मग वातावरण निवळलं.
रिफायनरी विरोधातील आंदोलनावर सध्या विरोधक ठाम आहेत. फक्त तीन दिवसात प्रशासनाने नीट चर्चा करावी, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. आज बारसूसाठी माती परीक्षण केलं जाणार होतं. त्यामुळे आंदोलकांच्या आंदोलनाची धार वाढली होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र उभे राहिलं आहे. आता तीन दिवसांनंतर चर्चेतून बारसू प्रकल्पाच्या विषयावर तोडगा निघणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.