
मराठी भाषा शिकविण्यासाठी अभिनव उपक्रम! पवई बेंगॉली वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार; ३ बाबींवर भर
बेंगॉली वेल्फेअर असोसिएशनतर्फे आपल्या बेंगॉली बांधवांसाठी मराठी भाषा शिकण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी संस्थेचे सदस्य हिरा पन्ना मॉल, हिरानंदनी पवई येथील कार्यालयात एकत्र येऊन मराठी भाषेचे धडे घेतात. वाचन, लेखन आणि संभाषण या तिन्ही बाबींवर भर देत मराठी भाषा शिकवली जात आहे.मराठी भाषेची गोडीही शिकणाऱ्यांना लागलेली दिसून येत आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या बिगरमराठी नागरिकांना स्थानिक भाषेचे ज्ञान मिळावे आणि संवाद अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नवनीत ढोमसे सर मराठी भाषा शिकवण्याचे कार्य करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग नियमितपणे पार पडत आहेत. बेंगॉली बांधव ठरलेल्या वेळेत आवर्जून उपस्थित राहून शिकण्याबाबत उत्साह दाखवत आहेत.(फोटो सौजन्य – AI)
शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; आमदार रोहित पवारांची मागणी
सामाजिक कार्याला पूरक म्हणून, पीबीडब्ल्यूएतर्फे अॅम्बुलन्स सेवा देखील चालवली जाते. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याची ही सेवा अनेकदा जीव वाचवणारी ठरली आहे. पीबीडब्ल्यूए भारत सरकारच्या क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची सक्रिय भागीदार असून, क्षयरोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना पौष्टिक अन्नधान्य पुरवून आरोग्य आणि उपजीविका या दोन्ही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
ग्रामीण महाराष्ट्रात, पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालासरी तालुक्यात ७७ जिल्हा परिषद शाळांमध्ये डब्ल्यूएएसएच (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) कार्यक्रमांतर्गत स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करून संस्थेने महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. अस्वच्छतेमुळे मुलींची शाळेतून होणारी अनुपस्थिती कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. झरी, गिरगाव, आमगाव, वासा आणि तालासरी या भागांमध्ये या कामाची यशस्वी अमलबजावणी झाली असून, या उपक्रमाला नीती आयोगाने सर्वोत्तम प्रथा’ म्हणून मान्यता दिली आहे.
पीबीडब्ल्यूएचे अध्यक्ष सौरभ मित्र यांच्या प्रयत्नातून आणि अशोक मुखर्जी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हिरानंदनी, पवई येथे यशस्वीपणे सुरू आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे भाषिक एकात्मता अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पवई बंगाली वेलफेअर असोसिएशन (पीबीडब्ल्यूए) ही २००६ साली स्थापन झालेली एक नोंदणीकृत धर्मादाय संस्था असून, पवई (मुंबई) आणि परिसरात सर्वसमावेशक सामाजिक विकास व सामुदायिक सहभागासाठी कार्यरत आहे. वंचित घटकांच्या उन्नतीवर भर देत, संस्थेचा प्रमुख उपक्रम ‘मिशन स्वयंसिद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना कौशल्य विकास, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कार्य करतो.