Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

भवन रचना विभागातील काही कार्यकारी अभियंत्यांना शहर अभियंत्यानंतर अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आल्याची बाब काँग्रेसने आक्षेपार्ह ठरवली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 06, 2026 | 09:41 AM
Pune Congress Protest, Arvind Shinde PMC, Pune Municipal Corporation News,

Pune Congress Protest, Arvind Shinde PMC, Pune Municipal Corporation News,

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना विभागातील कथित ढिसाळ कारभार
  • महत्त्वाच्या पदांवरील सर्व प्रभारी नेमणुका तात्काळ रद्द कराव्यात
  • अरविंद शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन
Pune Congress News: पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना विभागातील कथित ढिसाळ, मनमानी व नियमबाह्य कारभारावर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव आक्षेप नोंदवला आहे. महत्त्वाच्या पदांवरील सर्व प्रभारी नेमणुका तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली असून, यासंदर्भात शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तत्कालीन प्रभारी अभियंता, प्रभारी अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊन त्यांना जबाबदारीच्या पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. उलट, भवन रचना विभागातील काही कार्यकारी अभियंत्यांना शहर अभियंत्यानंतर अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आल्याची बाब काँग्रेसने आक्षेपार्ह ठरवली आहे.

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो… एपीएल अपोलोसह ‘या’ शेअर्सवर ठेवा तुमचं लक्ष, बाजारातील तज्ज्ञांनी केली शिफारस

काही कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंता पदाच्या सेवा ज्येष्ठतेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असताना, हा मुद्दा न्यायप्रविष्ट असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना प्रभारी पदभार देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी व तत्कालीन आयुक्त यांनी सेवा ज्येष्ठता यादीचा चुकीचा आणि सोयीस्कर अर्थ लावून या नेमणुका केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही प्रक्रिया नियम, शासकीय ठराव आणि न्यायालयीन तत्त्वांना धरून नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून

अभियंता पदावर आक्षेप

नुकतेच बांधकाम विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेले अधिकारी गेल्या सुमारे १५ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा महत्त्वाच्या पदावर नियमानुसार पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करणे आवश्यक असताना, उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश येण्यापूर्वीच घाईगडबडीत प्रभारी पदभार देण्यात आल्यास काँग्रेसने तीव हरकत घेतली आहे. पुणे महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन तसेच विभाग बांधकाम/विकास विभागातील सर्व प्रभारी नेमणुका तात्काळ रद्द कराव्यात. अधीक्षक अभियंता पदाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व सेवा ज्येष्ठतेच्या तत्त्वांनुसार काटेकोर अंमलबजावणी करावी. ही मागणी शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Web Title: Is there lax and irregular administration in the pune municipal corporation the city congress makes a serious allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

Pune Mayoral Election 2026: कोण होणार पुण्याचा महापौर? ‘या’ तीन नावांची चर्चा
1

Pune Mayoral Election 2026: कोण होणार पुण्याचा महापौर? ‘या’ तीन नावांची चर्चा

Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद
2

Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.