Sanjay Raut News: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आहे, त्यांना ती नीट सांभाळता आली पाहिजे असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. ” लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. एकेकाळी सरकार देखील लॉटरी चालवत होते. पण आजही महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी हा मकटा खेळला जातो, आकडे लावले जातात. गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असेल, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा मटका लागला आहे, त्यांनी तो नीटपणे सांभाळला पाहिजे, असे ते म्हणाले असावेत.
मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटके लोक चालवतात, रतन खत्रीचा याचा त्याचा, कल्याण, भगत, तुम्ही म्हणाल, हे मला कसं माहिती, तर एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रात पत्रकारिता केली आहे. त्यामुळे मला हे सगळे माहित आहे, नाहीतर भाजपचे हे चंगू, मंगू टंगू विचारतील. ते बरोबर आहेत. पण मटक्याचे आकडे सतत बदलत असतात, सकाळी वेगळा, संध्याकाळी वेगळा, रात्री वेगळाच, ते कुणाला सांभाळता येणार नाही. यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसलाय. ते दिल्लीत जाऊन आकडा लावत असतात. पण त्यांचा आकडा काय लागत नाही. ते सांभाळणं कठीण असतं, जे दिसतयं त्यानुसार त्यांना ते सांभाळता येत नाहीये, लवकरच त्यांच्या आकडा अस्थंगत होईल.
गणेश नाईकांनी मटका लावला नाही. ते आधी शिवसेनेत होते. मग ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले,आता ते भाजपमध्ये आहेत. त्यांच्या गतीने ते त्यांच राजकारण करत आहेत. त्यांनी जे विधान केलयं ते सूचक आहे, आणि विशेष म्हणजे त्यांनी ते ठाणे जिल्ह्यात जाऊन केलं आहे. असंही राऊतांनी सांगितलं. मुंबई हे आमचं टार्गेट आहे. जसं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई हातात घेण्याचं टार्गेट आहे, तसं मुंबई गुजरात्यांच्या हाती सोपवायची नाही हे ठाकरे बंधुंचं टार्गेट आहे, ती मराठी माणसाकडेच राहिल.
गिरीष महाजन हे काही महर्षी व्यास नाहीत, स्वत:च्या खाली काय जळतय ते आधी त्यांनी पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल, त्या दिवशी ते कुठे असतील, याचा त्यांनी विचार करावा, तोंडाच्या वाफा कोण घालवतयं कोण नाही, हे ठाकरे बंधु राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. फडणवीसांच्या भोवती गे जे चोर दरोडेखोर आहेत त्यांना सत्त नसल्यावर रस्त्यांवर फिरणेही मुश्लिक होऊन जाईल. तसेच, तुम्ही प्रमोद महाजन नाही तर जळगावचे गिरीष महाजन आहेत ते लक्षात राहूद्या, आणि तुमचे काय धंदे तुमचे आहेत तेही पाहा, असा टोला संजय राऊतांनी लगावला.