Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: माळी कुटुंबावर शोककळा! वळवलेल्या वाहतूकीने घेतला जीव मायलेकराचा जीव

Jalgaon News: जळगावमध्ये बायपासवरील उड्डाणपूल बंद असल्यामुळे जड वाहतूक पुन्हा शहरातून सुरू झाली असून, त्यातून झालेल्या भीषण अपघातात भाजी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला माळी यांचा मृत्यू झाला. भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 06, 2026 | 12:27 PM
Jalgaon News: माळी कुटुंबावर शोककळा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: माळी कुटुंबावर शोककळा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भरधाव टँकरच्या धडकेत मंगला माळी यांचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी.
  • बायपासवरील उड्डाणपूल बंद असल्याने जड वाहतूक शहरातून सुरू आहे.
  • घटनेनंतर वाहतूक नियोजन आणि रस्ते सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
Jalgaon Tanker Accident: जळगाव शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराबाहेरून जड वाहतूक जावी आणि शहरातील रस्ते मोकळे राहावेत, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल बंद पडल्याने मोठी वाहने पुन्हा शहरातून धावू लागली. याच बदललेल्या वाहतूक व्यवस्थेचा फटका एका कष्टकरी महिलेला बसला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

मंगला माळी या रोजप्रमाणे सकाळी आपल्या मुलासोबत भाजीपाला विकण्यासाठी बाजाराकडे निघाल्या होत्या. संसाराचा गाडा चालवण्यासाठी दोघेही मेहनत करत होते. मात्र शहरातील रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मंगला माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. एका क्षणात एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला. (Jalgaon News:)

या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा आरोप आहे की, उड्डाणपूल वेळेत सुरक्षित ठेवण्यात आणि पर्यायी वाहतुकीचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या वाहनांची गर्दी वाढली आणि त्यातून हा जीवघेणा अपघात घडला.

Jalgaon News: जळगावात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! नवाकोरा महामार्ग १५ …

लोकप्रतिनिधींची घटनास्थळी भेट

घटना घडल्यानंतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मदतीची आश्वासनेही देण्यात आली. मात्र नागरिकांचा प्रश्न वेगळाच आहे. प्रत्येक मोठ्या दुर्घटनेनंतर पाहणी आणि घोषणा होतात, पण प्रत्यक्षात जबाबदारांवर कठोर कारवाई का होत नाही? केवळ शोक व्यक्त करून किंवा मदतीची घोषणा करून समस्या सुटत नसल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

निकृष्ट दर्जामुळे बंद

बायपास मार्गासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला होता. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. पण उड्डाणपूल निकृष्ट दर्जामुळे बंद पडल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर संपूर्ण प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, जर काम दर्जेदार झाले असते तर आज जड वाहतूक शहरात आली नसती आणि कदाचित हा अपघातही टळला असता.

आता या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. उड्डाणपूलाच्या कामाची गुणवत्ता तपासली का गेली? दोष आढळल्यानंतर संबंधित ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? शहरात जड वाहने वळवण्यापूर्वी सुरक्षिततेचा विचार का करण्यात आला नाही? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळावीत, अशी मागणी होत आहे.

नागरिकांचे यावर काय मत?

जळगावकरांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ अपघातासाठी वाहनचालकाला दोषी ठरवून हा विषय संपणार नाही, असे नागरिकांचे मत आहे. या संपूर्ण प्रकरणामागील निष्काळजीपणा समोर यावा आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शहरातील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय किंवा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच उड्डाणपूलाची तातडीने दुरुस्ती करून तो सुरक्षित करावा आणि शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप

एका गरीब भाजीपाला विक्रेत्या महिलेचा मृत्यू हा फक्त अपघात म्हणून विसरून चालणार नाही. विकासाच्या नावाखाली उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता, प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा आज मंगला माळी यांच्या कुटुंबावर आलेले दुःख उद्या आणखी एखाद्या कुटुंबाच्या वाट्याला येणार नाही, याची खात्री कोण देणार?

Web Title: Jalgaon mangala mali died on the spot after being hit by a speeding tanker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Accident News
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
1

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
2

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
4

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.