Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matang samaj protest: १ ऑगस्टला मुंबईवर १ लाख लोकांचा धडक मोर्चा; सचिन साठे यांनी सरकारला दिला थेट इशारा

Matang samaj protest : अनुसूचित जातीच्या घटनात्मक उपवर्गीकरणासाठी परतूर येथे सकल मातंग समाजातर्फे मराठवाडा स्तरीय मोर्चा काढण्यात आला. १ ऑगस्टपर्यंत जीआर न निघाल्यास १ लाख लोक मुंबईवर धडकतील असा इशारा सचिन साठे यांनी दिला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 05:41 PM
matang

matang

Follow Us
Follow Us:

Matang samaj protest Partur: अनुसूचित जाती प्रवर्गाचे घटनात्मक उपवर्गीकरण तत्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने नगरसेवक बाबूराव हिवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून परतूर येथे मराठवाडा स्तरीय मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार परतूर यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.

या मोर्चादरम्यान आयोजित सभेत अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांनी रोखठोक भाषणात सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, उपवर्गीकरणाचा विषय जिवंत ठेवण्यासाठी मातंग समाजासाठी मारायलाही तयार आहे, १ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास १ लाख लोक मुंबईवर धडकणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

आपल्या भाषणात सचिन साठे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने या मोर्चाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा विषय जिवंत ठेवण्यासाठी आणि मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजायला व मारायलाही तयार आहे. आज समाजाला हीन दर्जा दिला जात आहे, याचे खूप वाईट वाटते.

शांततेत राहा, आपला विजय निश्चित आहे

छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा दाखला देत ते म्हणाले, शाहू महाराज म्हणाले होते की, आरक्षण दिल्याशिवाय समाज सुधारणार नाही. त्याकाळी जसा काही लोकांनी विरोध केला होता, तसाच विरोध आजचे काही लोक करत आहेत. यावरून ते कोणाची अवलाद आहेत हे सिद्ध होते.

IIT Teacher Shortage: देशातील २३ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापकांची पदे रिक्त? पण पीएचडी होऊनही पदे का भरली जात नाहीत?

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की प्रगत आणि अप्रगत जाती कोणत्या आहेत, जर येत्या १ ऑगस्टपर्यंत उपवर्गीकरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही, तर १ लाख लोक मुंबईवर धडकतील आणि जीआर सोबत घेऊनच परत येतील. त्यामुळे पोटराजांना हीनावणाऱ्या लोकांपासून सावध राहा, शांततेत राहा, आपला विजय निश्चित आहे.

..तर लोकप्रतिनिधींना गावबंदी

इतर वक्त्यांनी नमूद केले की, समाजाच्या हितासाठीच मातंग समाज उपवर्गीकरणाची मागणी करत आहे. समाजात हजारो उच्चशिक्षित तरुण रोजगारापासून वंचित आहेत. मातंग समाजाला सतत दुय्यम स्थान दिले जाते, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपवर्गीकरण अत्यंत आवश्यक आहे. ज्या मातंग समाजाने फडणवीस यांना खुर्चीवर बसवले, तोच समाज त्यांना खाली उतरवू शकतो.

MPSC Big Decision: विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC चा मोठा निर्णय; संगणकीय परीक्षेचा निर्णय स्थगित!

१ ऑगस्टपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास सर्व आमदारांसह लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जाईल, तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरात साप सोडण्याचे आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. दिल्लीत झालेल्या लाठीहल्ल्याचा सभेत तीव्र निषेध करण्यात आला. समाजातील नेत्यांना बदनाम करून हा लढा कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानत नाहीत, आम्ही त्यांना मानत नाही, असे सांगत वक्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच रामदास आठवले व इतर नेत्यांनी समाजाला दाबून ठेवल्याचा आरोप केला.

Web Title: Matang samaj morcha partur sub classification sachin sathe warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Protest

संबंधित बातम्या

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
1

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Nigeria Protest : खाण कामगारांच्या मृत्यूने संतापाचा भडका! आंदोलनकर्त्यांवर सैन्याचा गोळीबार
2

Nigeria Protest : खाण कामगारांच्या मृत्यूने संतापाचा भडका! आंदोलनकर्त्यांवर सैन्याचा गोळीबार

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
3

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.