
दापोलीत अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एल्गार
अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एल्गार
दापोलीत ग्रामस्थांचा जनआक्रोश
देवाला साकडे घालत एकमुखी विरोध
दापोली: दापोलीतील आघारी आणि भिवबंदर येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या घोषणेनंतर दापोली तालुका अवघ्या कोकणात चर्चेत आला आहे. दरम्यान आता दापोरी तालुक्यात या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध होऊ लागला आहे.या भागात विरोधाचा सूर वाढत असलेल पाहायला (Ratnagiri) मिळतोय.
आज प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांचा जनआक्रोश दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून या प्रकल्पाच्या विरोधात वणौशी आणि दुमदेव या दोन्ही गावांचे ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिरात एक महत्त्वपूर्ण व निर्णायक सभा पार पाडली.
सभेदरम्यान सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘हा विनाशकारी प्रकल्प आमच्या निसर्गसंपन्न भूमीत आणि परिसरात अजिबात येऊ नये’, अशी आर्त प्रार्थना करत देवाला साकडे घातले. सध्या गणेशोत्सवा निमित्त मुंबईहून गावी आलेल्या चाकरमान्यांनी या सभेला अभूतपूर्व गर्दी केली होती. चाकरमान्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे या स्थानिक आंदोलनाला आता प्रचंड बळ मिळाले आहे.
Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’
या सभेने संघटित विरोधाची ठिणगी टाकली असून येत्या काही दिवसांत वणौशी आणि दुमदेव गावांची भव्य ग्रामपंचायत महासभेचे आयोजन होणार असून होणाऱ्या आगामी महासभेत अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात सर्व गोष्टींची पूर्तता करून एल्गार पुकारत पुढील दिशा ठरवली जाणार आहे. तसेच आता संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष या लढ्याकडे लागून राहिले आहे.
ग्रामपंचायत महासभेत इतर गावांची हि या विरोधात काय भुमिका असेल हे सुद्धा पुढे होणाऱ्या महासभेत ठरणार आहे. त्याचबरोबर आपली भूमी… आपला हक्क, असे म्हणत कोकणचे निसर्गसौंदर्य आणि शेतकऱ्यांचा रोजगार वाचवण्यासाठी, अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असल्याचे दोन्ही गावांची मते स्पष्ट करण्यात आली आहेत.
पिढ्यानपिढ्यांचा वारसा प्रकल्प: प्रस्तावित असलेली जागा आणि त्याला लागून असलेल्या अनेक गावांतील स्थानिक शेतकरी पिढ्यानपिढ्या आंबा, काजू, सुपारी, भातशेती आणि पारंपरिक मच्छीमारी करून आपले जीवन समृद्ध करत आहेत.
निसर्ग आणि रोजगाराचे रक्षण आपल्या पूर्वजांनी जिवाने जपलेली सुपीक शेती, हक्काचा रोजगार आणि कोकणाचे स्वर्गीय सौंदर्य कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला. विक्रीला पूर्ण बंदी ‘प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी विकून आमचे हिरवेगार कोकण संपवण्याचा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही’, असा सडेतोड इशारा या वेळी देण्यात आला.
आंदोलनाची पुढील दिशा: लवकरच भव्य महासभेचे आयोजन