Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद

ओतूर (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 05:51 PM
ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल 'इतके' बिबटे जेरबंद

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल 'इतके' बिबटे जेरबंद

Follow Us
Follow Us:
  • ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला
  • नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
  • आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडले
ओतूर/ मनोहर हिंगणे : ओतूर (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री ओतूरजवळील गाढवपट भागात वनविभागाने बसवलेल्या पिंजऱ्यात दीड वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलवून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडण्यात आले आहेत. यामध्ये मादी, नर व बछड्यांचा समावेश आहे. तरीही या भागातील बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही, ज्यामुळे वनविभागासमोर मोठे आव्हान उभे आहे.

 

ओतूर तसेच आजूबाजूच्या कोपरे आणि मांडवे भागात बिबट्यांचा वावर गत काही दिवसांपासून वाढल्याचे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. विशेषतः गाढवपट परिसरात पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले झाल्याचे समोर आले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. रात्री सावजाच्या शोधात आलेली ही बिबट मादी पिंजऱ्यात अडकली असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

शेतकरी, पालकांमध्ये भीती

ओतूर परिसरातील ऊस शेती बिबट्यांसाठी आकर्षक आश्रयस्थान ठरत असल्याचे जाणवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याच्या वेळेस जीवाची भिती वाटत आहे. तसेच, अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ल्याची शक्यता पाहून पालकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी शेळ्या-मेंढ्या तसेच पाळीव कुत्र्यांच्या अकस्मात हरवणाऱ्या संरक्षणविना हालचालीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

परिसरातील बिबट्या पकडला गेला असला तरी धोका टळलेला नाही. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना हातात बॅटरी आणि काठी ठेवावी, तसेच मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत जेणेकरून आवाजाने बिबट्या लांब जाईल. -तेजस कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर

परिसरात गस्त वाढवणार

वनविभाग या परिसरात गस्त वाढवणार असून, गरज भासल्यास आणखी काही संवेदनशील ठिकाणी पिंजरे लावले जाणार आहेत. तसेच, ‘थर्मल ड्रोन’च्या सहाय्याने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा विचारही प्रशासनाकडून केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

Web Title: Increased leopard activity in otur area has created fear among farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Farmers
  • Leopard
  • Leopard Attack
  • Leopard caught

संबंधित बातम्या

बेनी बुद्रुकमध्ये घरात घुसून बिबट्याचा हल्ला; टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घातली झडप
1

बेनी बुद्रुकमध्ये घरात घुसून बिबट्याचा हल्ला; टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घातली झडप

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड
2

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा
3

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
4

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.