Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ ! दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड

भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार कालिदास कोळंबकर यांना राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी अध्यक्षपदाची शपथ दिली. विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या शनिवार दि. ७ डिसेंबर २०२४ पासून बोलवण्यात आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 06, 2024 | 09:07 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे. विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या शनिवार दि. ७ डिसेंबर २०२४ पासून बोलवण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज (शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४) शपथ घेतली. याआधी २०१४ सालीदेखील त्यांनी हंगामी अध्यक्षपद भुषविले होते. राज्यापालासंहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

आगरी समाजाला विरोध नाही, पण सूट का दिली जाते ? जागरुक नागरिकाने घेतली हरकत

कोण आहेत कालिदास कोळंबकर?

कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्र विधानसभेचे आठ वेळा सदस्य झाले आहेत. ते शिवसेनेतर्फे पहिल्यांदा  1990 साली नायगाव मतदारसंघातून  आमदार झाले.  त्यानंतर  1995, 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार म्हणून एकूण सलग चार वेळा नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र 2005 साली त्यांनी नारायण राणे यांना साथ देत शिवसेना पक्ष सोडला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.   2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून वडाळा मतदारसंघातून विजय मिळवला.

2019 च्या निवडणुकी अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019  आणि 2024 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून वडाळा मतदारसंघात विजय मिळवला. सलग 8 वेळा विजय मिळवणाऱ्या आमदारांपैकी कोळंबकर एक आहेत.

Breaking News: ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हंगामी अध्यक्षाची निवड

भारतीय राज्यघटनेच्या कलम 180 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की राज्याचे राज्यपाल विधानसभेचे संचालन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करू शकतात, जो तात्पुरता अध्यक्ष म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून काम करेल. या हंगामी अध्यक्षाचा कार्यकाळ हा स्थायी विधानसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंतच असतो. हंगामी अध्यक्ष म्हणून अनेकदा सभागृहातील ज्येष्ठ आमदारांची निवड केली जाते.

हंगामी अध्यक्षांची कार्ये 

हंगामी अध्यक्षाच्या कर्तव्यांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणे, विधानसभा अध्यक्षांची निवड करणे, सभागृहामध्ये बहुमत चाचणी घेणे  आणि स्थायी विधानसभा अध्यक्षांची  निवड होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे यांचा समावेश होतो.

कोळंबकर यांना 2014  मध्येही हंगामी अध्यक्ष  बनवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन  उद्या  शनिवार 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही 9 डिसेंबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची पुन्हा नियुक्ती केली जाईल अशी चर्चा आहे.

Web Title: Kalidas kolambkar takes oath as protem speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 09:07 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.