Kalyan Mandivali Marathi receptionist gokul zha case New twist receptionist assaulted first
Kalyan receptionist case : कल्याण : कल्याणमधील नांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयामधील मारहाणीची राज्यभरा चर्चा सुरु आहे. कल्याणच्या नांदिवली परिसरातील श्री बाल चिकित्सालयमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. गोकुळ झा असे या मारहाण केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणावरुन मनसे आक्रमक झाली असून मनसे या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यावरुन वातावरण तापलेले असताना या मारहाणीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे.
नांदिवली येथील डॉ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयामध्ये रविवारी (दि.20) मोठा वाद निर्माण झाला होता. या रुग्णालयामधील रिस्पेशनिस्ट तरुणी सोनाली कळासरे (वय वर्षे 25) हिचा परप्रांतीय गोकुळ झा याच्यासोबत वाद झाला. या वादाचे स्वरुप माराहाणीमध्ये झाले. गोकुळ झा याने तरुणीला छातीवर लाथ मारली. त्यानंतर तिचे केस ओढून तिला फरफडत बाहेर ओढले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मराठी तरुणीला परप्रांतीय कुटुंबाने केलेल्या मारहाणीमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र आता या प्रकरणातील नवा ट्विस्ट समोर आला आहे. मारहाण झालेल्या तरुणीने पहिल्यांदा मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कल्याण रिस्पेशनिस्ट तरुणी मारहाण प्रकरणी नवा दावा समोर आला आहे. रविवारी डॉ. अनिकेत पालांडे हे उशीरा रुग्णालयामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी थेट एमआर लोकांना केबीनमध्ये बोलावून मिटिंग घेतली. मात्र झा कुटुंब हे आधीपासून डॉक्टरांची वाट पाहत राहिले होते. लहान मुलगा आजारी असल्यामुळे झा पती पत्नी हे मुलाला घेऊन रुग्णालयामध्ये आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ देखील होता. रिस्पेशनिस्ट तरुणीला झा कुटुंबाने डॉक्टरांची तातडीने भेट मागितली. आम्हाला आत जायचं आहे असं सांगितलं. मात्र तरुणीने डॉक्टर एमआरसोबत मिटिंगमध्ये असल्याचे तरुणीने सांगितले. यानंतर झा कुटुंब आणि रिसेप्शनिस्ट तरुणीमध्ये शाब्दिक चकमक झाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणी आणि झा कुटुंबामधील वाद वाढला. शाब्दिक वादामध्ये शिवीगाळ झाली. यानंतर रिसेप्शनिस्ट असलेल्या सोनाली कळासरे या तरुणीने गोकुळ झा यांच्या वहिनींच्या कानाखाली मारली तसेच शिवीगाळ केली. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. यामध्ये तरुणी महिलेच्या कानाखाली मारत असल्याचे दिसत आहे. यानंतर शाब्दिक वादानंतर चिडलेला गोकुळ झा हा पुन्हा आत आला आणि त्याने चवताळून तरुणीवर अमानुषपणे हल्ला केला. या प्रकरणाचे नवीन सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर आता गोकुळ झा याच्यावर काय कारवाई होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.