Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना; MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!

डोंबिवली MIDC क्षेत्रातील निवासी, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीकडून दर महिन्याला पाण्याची बिलं पाठवली जातात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2026 | 04:58 PM
KDMC News : अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना;  MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!
Follow Us
Close
Follow Us:
  • अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना;
  • MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!
 KDMC News :  डोंबिवली MIDC क्षेत्रातील निवासी, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीकडून दर महिन्याला पाण्याची बिलं पाठवली जातात. वर्षभरापूर्वीच पाणी दरात वाढ करण्यात आली होती. सध्या निवासी ग्राहकांसाठी 9.25 रुपये प्रति क्यूबिक मीटर तर औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांसाठी 25.25 रुपये प्रति क्यूबिक मीटर दर आकारला जात आहे. त्याशिवाय ड्रेनेज चार्जेस आणि त्यावर 18 टक्के GST देखील आकारला जात असल्याने बिलाचा आकडा मोठा होत आहे.आता या बिलांमध्ये अतिरिक्त रक्कम (डिपॉझिट) समाविष्ट करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत वितरित झालेल्या बिलांमध्ये अनेक ग्राहकांना 500 रुपयांपासून 9450 रुपयांपर्यंत तर काहींना 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम 23 मार्च 2026 पर्यंत एकरकमी भरण्याची अट घालण्यात आली आहे. MIDCच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा महिन्यांच्या सरासरी बिलाच्या आधारावर तीन महिन्यांचे बिल डिपॉझिट म्हणून घेतले जाते. पूर्वी भरलेली अनामत रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम ‘अतिरिक्त डिपॉझिट’ म्हणून ग्राहकांना आकारली जात आहे.

मात्र, ग्राहकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील नागरिक राजू नलावडे यांनी MIDC कडून आम्हाला बिल पाठवण्यात आली. त्याच्यात ॲडिशनल डिपॉझिट पाठवले आहे. याबाबत एमआयडीसीला विचारणा केली असता त्यांनी तीन महिन्याची सरासरी भाडं डिपॉझिट म्हणून घेतो असे सांगितलं. यापूर्वी घेतलेले डिपॉझिट कमी असल्याचे सांगत दरवर्षी आम्ही तीन महिन्याचं दर डिपॉझिट आमच्याकडे घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता कोणाला नऊ कोणाला दहा तो कोणाला बारा हजार इतकी डिपॉझिट भरण्याची रक्कम बिलात आलेली आहे. मात्र ही रक्कम हळूहळू नाही तर एकाच टप्प्यावरती भरणा सांगितलेले आहे एकीकडे महावितरणला दरवर्षी आम्ही डिपॉझिट करतो. आता दुसरीकडे आय डी सी देखील पाण्यावर डिपॉझिट घेत आहे या डिपॉझिट रक्कमवर करोडो रुपये एमआयडीसी गोळा करत आहे.

KDMC News: कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार, महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर

एकीकडे अनधिकृत बांधकाम धारक अनधिकृत नळाची जोडणी करत असल्याने आमच्या घरात पाणी येत नाही तर दुसरी कडे माहितीच्या अधिकारात 14% पाण्याची गळती होत असल्याची माहिती अधिकारात मिळत आहे. या सर्व गोष्टी सुरू असताना स्वतः सुधारणा न करत नाही लोकांकडून डिपॉझिट च्या नावाने वसुली करण्याचं काम एमायडिसीच सुरू आहे प्रत्येकाला बिलात वेगवेगळे डिपॉझिट आलेले आहेत 500 पासून 12000 पर्यंत हे डिपॉझिट रक्कम आलेली आहे यामुळे आमची मागणी एकच आहे की डिपॉझिट तुम्ही घेऊ नका. याआधी बिलामध्ये देखील एमआयडीसी ने वाढ केली होती त्यामुळे डिपॉझिट घेऊ नका, यामुळे आम्हाला अतिरिक्त भार पडत असल्याचं डोंबिवलीतील नागरिकांनी सांगितले यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Central Railway : बदलापूर ते कर्जत प्रवास होणार सुस्साट! रेल्वे प्रकल्पासाठी जमीनीचा मोबदला मिळवून देण्याचा बारणेंचा प्रयत्न

Web Title: Kdmc news water not available due to unauthorized tap connections midc slaps deposit on water bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Dombivali
  • KDMC
  • MIDC

संबंधित बातम्या

“पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना…”; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती
1

“पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना…”; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?
2

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.