विटा : खानापूर पंचायत समितीच्या (Khanapur Panchayat Samiti) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत गटारी अमावस्याच्या मुहूर्तावर निघाली. सकाळी ११ वाजता मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आरक्षण सोडत निघाली. उपविभागीय अधिकारी संतोष भोर , तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत निघाली.
तालुक्यातील आठ पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत निघाली. नागेवाडी गणचे आरक्षणप्रारंभी निघाले. त्यानंतर क्रमक्रमाने आरक्षण काढण्यात आले. नागेवाडी, गार्डी, बलवडी (खा.) सर्वसाधारण जागेसाठी आहे. भाळवणी, करंजे हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. लेंगरे गणात अनुसूचित जाती महिलांच्या राखीव आहे. पारे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूषसाठी आरक्षित आहे. यावेळी आरक्षण सोडतीच्या ठिकाणी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
खानापूर पंचायत समिती आरक्षण :
नागेवाडी – सर्वसाधारण
गार्डी- सर्वसाधारण
लेंगरे- अनुसूचित जाती महिला
पारे- ना. मा. प्र. पुरुष
भाळवणी – सर्वसाधारण महिला
आळसंद- ना. मा. प्र. महिला
करंजे – सर्वसाधारण महिला
बलवडी (खा.) -सर्वसाधारण