Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandala Court Strike : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, खंडाळा न्यायालयातील कामकाजावर परिणाम

Khandala Court Strike : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 09:11 PM
Khandala Court

Khandala Court

Follow Us
Follow Us:
  • वेतनश्रेणीच्या मागणीसाठी खंडाळा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
  • उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याची मागणी
  • खंडाळा बार असोसिएशनचा संपाला पाठिंबा
 

खंडाळा : महाराष्ट्र राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी,या प्रमुख मागणीसाठी खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे पडसाद खंडाळा न्यायालयातही उमटले असून, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. (Khandala Court Strike)

उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी,या मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी संपावर गेले आहेत.या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजाची नियमित प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बार असोसिएशनचाही आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, खंडाळा तालुका बार असोसिएशननेही न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे खंडाळा न्यायालय परिसरात कर्मचाऱ्यांच्या संपाला वकिलांकडूनही समर्थन मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Satara Court Employees : न्यायालयीन कामकाज ठप्प होण्याची शक्यता! राज्यभरातील कर्मचारी बेमुदत संपावर

निर्णय होईपर्यंत हा संप सुरूच कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका

मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यावेळी खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सहाय्यक अधिक्षक प्रदिप बाबर, वर्षाराणी शेलार, ज्ञानेश्वर इथापे, सारंग पवार, किरण कुलकर्णी, स्वामी माळी, प्रविण घाडगे, रोहित जमदाडे, साक्षी शेलार, प्रसाद दगडे, राजेंद्र अडागळे, तुषार जगताप, शांतिलाल भुजबळ, तुळशीदास लाखे, दत्ताञय शिंदे, योगिता निवळे, बंदेनवाज शेख हे सहभागी झाले आहेत.

आता शासन या मागणीबाबत काय निर्णय घेते आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा हा संप किती दिवस सुरू राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: खंडाळा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे?

    Ans: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी खंडाळा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

  • Que: न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला कोणाचा पाठिंबा आहे?

    Ans: खंडाळा तालुका बार असोसिएशनने न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे वकिलांकडूनही या आंदोलनाला समर्थन मिळत आहे.

  • Que: संपाचा खंडाळा न्यायालयावर काय परिणाम झाला आहे?

    Ans: कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील नियमित कामकाज आणि प्रशासकीय प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

Web Title: Khandala court employees indefinite strike salary scale demand vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Court News
  • khandala news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.