
नारायणगाव : नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात हरियाणा राज्यातील आयशर ट्रक चालक राहुल कुमार जगमल सिंह चौधरी याला खेड येथील सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर एसटी बस चालक भाऊसाहेब भास्कर जायभाय (वय ४०)याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. या अपघातात नऊ जणांनी आपला जीव गमावला होता.
अपघाताला जबाबदार असणाऱ्या आयशर ट्रक चालक राहुलकुमार जगमलसिंह चौधरी ( वय ३०)याची पोलीस कस्टडी संपल्याने त्याला आज खेड न्यायालयात हजर केले. त्याच वेळी एसटी चालक भाऊसाहेब भास्कर जायभाय यालाही न्यायालयात हजर केले होते. अपघातानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि जमावाच्या प्रतिक्रिया लक्षात घेता, एसटी चालक जायभाय याला नारायणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. तर आयशर चालक चौधरी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चाकण येथून अटक केली होती.
आरोपीने वाहतूक नियमांचे पालन न केल्याने तो या अपघातात कारणीभूत असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आला. अपघातानंतर बस चालक कुठेही पळून न जाता अपघातामध्ये जखमीं झालेल्या प्रवाशाना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी त्यांनी मदत केली असा युक्तिवाद आरोपीचे वकील एडवोकेट केतन कावळे यांनी केला. त्यामुळे बस चालक जायभाय यांना जामीन मंजूर झाला. सरकार पक्षाच्या वतीने एडवोकेट देशपांडे यांनी युक्तिवाद केला.
हेही वाचा: Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू, काही गंभीर जखमी
कसा घडला अपघात?
नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारे वाहन आणि एसटी यांच्यात एक विचित्र अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली की, आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सहा जण ठार असून काहीजण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.
आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसची मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत झाला आहे. तर उर्वरित गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा: Jejuri Accident: जेजुरीत एसटी बसची दुचाकीला धडक; भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू
आळंदीहून पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजावळ बेलसर क्रॉसिंगवर एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन भीषण झाला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत एकाच वस्तीतील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे परिसरावर शोककळा पसरली आहे. रमेश किसन मेमाणे (वय 60), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) अशी या तिघांची नावे आहेत.तिघेही पुरंदर तालुक्यातील बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे येथील रहिवाशी आहेत.