Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किआ ही ‘फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक भारत २०२२™ साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार’ 

सेल्टोस, कार्निव्हल आणि कॅरेन्ससह ६८ वाहने फिफाला सर्व वाहतूक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरवण्यात आली आहेत

  • By Aparna
Updated On: Oct 11, 2022 | 05:24 PM
किआ ही ‘फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक भारत २०२२™ साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार’ 
Follow Us
Follow Us:

मुंबई : देशातील सर्वात वेगाने वाढणार्‍या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या किआ इंडिया ने फिफा ला त्यांच्या उत्पादन श्रेणीमधील ६८ वाहनांचा पुरवठा केला आहे. ज्यामुळे अंडर-१७ महिला विश्वचषक भारत २०२२ मध्ये वाहतुकीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. ७ ऑक्टोबर २०२२™ रोजी डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे झालेल्या वाहन हस्तांतर समारंभात किआ कॅरेन्सच्या 30 युनिट्स, किआ कार्निव्हलच्या २० युनिट्स आणि किआ सेल्टोसच्या १८ युनिट्ससह एकूण ६८ वाहने फिफा अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. या समारंभाला किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क आणि जेम यार्झा, संचालक, फिफा स्पर्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

किआ ही फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक भारत २०२२™ साठी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार आहे. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय फुटबॉल संघ, पंच, सामना अधिकारी, प्रतिनिधी आणि इतर व्हीआयपींना नेण्यासाठी फिफा द्वारे किआ च्या सदर वाहनांचा वापर केला जाईल. किआ या संपूर्ण स्पर्धेत फिफा ला २४ तास रस्त्याच्या कडेला मदत देखील प्रदान करेल.

किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क म्हणाले, “फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक भारत २०२२™ शी अधिकृत ऑटोमोटिव्ह भागीदार म्हणून संबद्ध असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. भारतात फुटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, ही भागीदारी येथे नैसर्गिकरित्या फिट झाली. फिफा टूर्नामेंट ला जगभरात लाखो फुटबॉल चाहते फॉलो करतात आणि अशा प्लॅटफॉर्मशी संलग्न केल्याने आम्हाला किया ला उत्साही लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचविता येईल. किआ आणि फिफा दीर्घकालीन भागीदार आहेत आणि भारतातील या कार्यक्रमाचा एक भाग असणे हा एक जणू विशेष विशेषाधिकारच आहे. खेळांच्या आवडीसह, किआ इंडिया सर्वांच्या गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करणारी जागतिक दर्जाची उत्पादने देऊन अशा जागतिक स्पर्धांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

जेम यार्झा, संचालक फिफा टूर्नामेंट म्हणाले, “किया ही बर्‍याच काळापासून फिफा ची विश्वासू भागीदार आहे आणि २०२२™ च्या अंडर-१७ महिला विश्वचषक भारतासाठी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही फारच उत्सुक आहोत. किआ ला आमच्या वाहतुकीच्या गरजा समजतात आणि ती अश्या इव्हेंटच्या यशस्वी ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आम्हाला विश्वास आहे की किआ सोबतची ही भागीदारी व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि फुटबॉलला जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.”

२००७ मध्ये भागीदारी सुरू झाल्यापासून फिफा विश्वचषकासह™ अनेक कार्यक्रमांसाठी किआ ही फिफा ची अधिकृत प्रायोजक आहे. फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक भारत २०२२™, ११ ते ३० ऑक्टोबर’२२ दरम्यान भारतात होणार आहे आणि यावेळी खेळले जाणारे सामने नवी मुंबई, भुवनेश्वर आणि गोवा येथे होणार आहेत. द्वैवार्षिक युवा स्पर्धेची ही ७ वी आवृत्ती आहे आणि भारताद्वारे आयोजित करण्यात येणारी पहिली-वहिली फिफा महिला स्पर्धा आहे.

Web Title: Kia is the official automotive partner for fifa u 17 womens world cup india 2022 nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 05:24 PM

Topics:  

  • india
  • tournament

संबंधित बातम्या

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
1

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.