Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : बालदिनी रंगणार कॅरमचा थरार; प्रल्हाद नलावडे स्मृती चषकासाठी 64 खेळाडू सज्ज

Carrom Tournament : बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी कांदिवली येथे सहावी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा रंगणार आहे. 14 वर्षांखालील 64 खेळाडू सहभागी होणार असून पहिल्या 16 खेळाडूंना पुरस्कार दिले जाणार आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 12, 2026 | 07:44 PM
Carrom Tournament : बालदिनी रंगणार कॅरमचा थरार; प्रल्हाद नलावडे स्मृती चषकासाठी 64 खेळाडू सज्ज

Carrom Tournament : बालदिनी रंगणार कॅरमचा थरार; प्रल्हाद नलावडे स्मृती चषकासाठी 64 खेळाडू सज्ज

Follow Us
Follow Us:
  • 14 वर्षांखालील शालेय विनाशुल्क स्पर्धा
  • नामवंत खेळाडूंचा सहभाग
  • पहिल्या 16 खेळाडूंना पुरस्कार
 

बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या प्रल्हाद नलावडे स्मृती चषक 14 वर्षांखालील शालेय कॅरम स्पर्धेत (Carrom Tournament) विजेतेपदासाठी राज्यातील 64 खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाई फाउंडेशन आणि अविनाश नलावडे स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर रोजी या विनाशुल्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कांदिवली पश्चिम येथील साईनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलच्या सभागृहात सिनको प्लॅटिनम चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा होणार आहे. यंदाच्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेतील विजेता केवल कुळकर्णी आणि बीएमसी-मुंबई पब्लिक स्कूल कांदिवलीचा सार्थक सिंग यांच्यातील लढतीने स्पर्धेची सुरुवात होईल. उद्घाटनप्रसंगी मुख्याध्यापक संदीपान घुले, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शशिकलाई फाउंडेशनचे प्रमुख रामेश्वर लोहे, क्रीडापटू गोविंदराव मोहिते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

नामवंत खेळाडूंचा सहभाग

स्पर्धेत आयडियल शालेय कॅरम स्पर्धेचा विक्रमी विजेता पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्न गोळे, एसकेकेई मुलुंडचा केवल कुळकर्णी, आरपीडी सावंतवाडीचा भरत सावंत, संकल्प व्हॅली-पुणेचा हर्षित शिंदे आणि विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

याशिवाय नक्ष वैती, अनय म्हेत्रे, शिवांश मोरे, दुर्वेश चव्हाण, विहा राणे, गौरी सावंत आणि आरव आंजर्लेकर हे खेळाडूही विजेतेपदासाठी आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. त्यामुळे स्पर्धा रंगतदार होणार आहे.

Mumbai City FC : आय-लीगचा गोलमशीन आता मुंबई सिटीच्या ताफ्यात; लुका माजसेनशी करार

पहिल्या १६ खेळाडूंना पुरस्कार

शालेय खेळाडूंचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा पुरस्कारांमध्ये वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना स्ट्रायकरसह पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे बालदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कॅरमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.

Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा

Web Title: Pralhad nalawade memorial school carrom tournament 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • Kandivali
  • Sports
  • tournament

संबंधित बातम्या

World Championship  : विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताचा सुवर्णवेध! मनू भाकर, ईशा सिंह आणि दिव्या यांची ऐतिहासिक कामगिरी
1

World Championship : विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताचा सुवर्णवेध! मनू भाकर, ईशा सिंह आणि दिव्या यांची ऐतिहासिक कामगिरी

Carrom Tournament : बालदिनी रंगणार शालेय कॅरमचा डाव; प्रल्हाद नलावडे स्मृती स्पर्धेत मोफत प्रवेश
2

Carrom Tournament : बालदिनी रंगणार शालेय कॅरमचा डाव; प्रल्हाद नलावडे स्मृती स्पर्धेत मोफत प्रवेश

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा
3

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली
4

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.