
किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन
फाउंडेशनच्या सदस्यांनी पोवई नाक्यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जात जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेत खालील कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की किन्नर समाज हा परंपरेने गुण्यागोविंदाने एकोप्याने व शांततेने राहतो. मात्र सदर व्यक्ती विविध ठिकाणी खळबळ जनक विधाने करून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
बिपाशा उर्फ आकाश राजू मणिक्कम यांनी जातिवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे समाजातील ऐक्य धोक्यात आले असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वाघमारे यांच्या बाबत देखील वाद निर्माण करून किन्नर समाजात अनावश्यक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून किन्नर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे