Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : सभापती निवडीवेळी पत्रकारांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

इतिहासात कधीच माध्यमांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी अटकाव केला गेला नव्हता. सभापतीपदांच्या निवडीवेळी पत्रकारांना परवानगी मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2026 | 11:29 AM
Satara News : सभापती निवडीवेळी पत्रकारांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Satara News : सभापती निवडीवेळी पत्रकारांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज (दि.4) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी व विषय समिती सभापती निवडीसाठी अधिकृत पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी माध्यमांना परवानगी दिली गेली नव्हती. यावरून बराच वादंग झाला होता. त्यानंतर आता जिल्हाधिकारी पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे तसेच सातारा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात फोनवरून नाराजी व्यक्त केली होती. इतिहासात कधीच माध्यमांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी अटकाव केला गेला नव्हता. सभापतीपदांच्या निवडीवेळी पत्रकारांना परवानगी मिळाली पाहिजे, अशी भूमिका पाटणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यांच्याकडे फोनवरून मांडली तर हरीष पाटणे यांच्या सूचनेवरून सातारा पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर परवानगीचे पत्र पाठवले.

दरम्यान, या पत्राची जिल्हाधिकारी पाटील यांनी दखल घेतली. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी माध्यमांना वार्तांकन करण्यास परवानगी दिली आहे. साताऱ्यातील पत्रकारांनी नियमांचे पालन करून वार्तांकन करावे, असे आवाहन सातारा पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

निवडणूक केवळ औपचारिक प्रक्रिया नसून प्रशासनासाठी कसोटी

सातारा जिल्हा परिषदेतील विषय समिती निवड पार पडणार असून, या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, यंदाची निवडणूक केवळ औपचारिक प्रक्रिया नसून प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. मागील निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळ आणि राड्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी निष्पक्षता, पारदर्शकता आणि कायद्याचे काटेकोर पालन यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

Satara : कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Web Title: Journalists permitted during chairpersons election satara district collectors significant decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
1

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
2

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
3

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.