Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा? ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगली महापालिकेत ३,८२७ जन्मदाखले बोगस असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची एफआयआर आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 06, 2026 | 08:21 PM
सांगलीत ३,८२७ जन्मदाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप (Photo Credit- X)

सांगलीत ३,८२७ जन्मदाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा?
  • ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!
  • वाचा संपूर्ण बातमी!
सांगली: महापालिकेने गेल्या १६ महिन्यांत जारी केलेल्या ३९ हजार ९०६ जन्मदाखल्यांपैकी ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. संबंधित दाखले रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली. सोमय्या यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासह जन्मप्रमाणपत्र प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयाला भेट देऊन जन्मदाखल्यांबाबत माहिती घेतली. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, स्थायी समिती सभापती अतुल माने, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, गिरीश पाठक आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, “सांगली शहरात मोठ्या प्रमाणावर जन्मप्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. गेल्या १६ महिन्यांत जन्मदाखल्यांमध्ये सुधारणेच्या नावाखाली ३९ हजार ९०६ दाखले देण्यात आले. त्यापैकी ३ हजार ८२७ प्रमाणपत्रे संशयास्पद असून ती रद्द करण्याचा निर्णय महापौर व अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. उर्वरित सुमारे ३५ हजार दाखल्यांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात येणार आहे.”

नवजात बालकांच्या जन्मनोंदणीवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरविले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुमारे १७ ते १८ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकारात अनेक वर्षांपूर्वीच्या जन्मनोंदींमध्ये प्रमाणपत्रे देताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. जुने दाखले देताना आवश्यक कागदपत्रे व चौकशी बंधनकारक असून, अशा प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “सध्या संशयित ठरविण्यात आलेले ३,८२७ दाखले खरे की खोटे, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे

महापालिका प्रशासनाने जन्मदाखल्यात सुधारणा केल्याचा दावा केला असला, तरी नेमक्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत, अवघ्या दहा दिवसांपूर्वी प्रशासनाने कोणताही घोटाळा नसल्याचा दावा केला होता; मात्र आता हजारो प्रमाणपत्रांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेचाही उल्लेख करत सोमय्या म्हणाले, सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघांतील मतदार यादीत पुराव्याविना हजारो नावे असल्याची तक्रार करण्यात आली असून त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

कागदोपत्री पुरावे घेऊनच सुधारणा; बोगस दाखल्यांचा आरोप फेटाळला

महापालिकेने जन्मदाखल्यांमध्ये सर्व सुधारणा आवश्यक कागदोपत्री पुराव्यांच्या आधारेच केल्याचा दावा उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केला. नावातील त्रुटी, पत्ता, आई-वडिलांच्या नावातील चुका आदी दुरुस्त करण्यात आल्या असून प्रत्येक सुधारणेचे पुरावे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. जन्मदाखल्यात सुधारणा करण्याचे अधिकार निबंधकांना असून त्यानुसारच प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सध्या क्यूआर कोड असलेल्या डिजिटल जन्मदाखल्यांची मागणी होत असून, नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून ते वितरित केले जात आहेत. त्यामुळे बोगस दाखल्यांचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Kirit somaiya alleges 3827 birth certificates in sangli are bogus demands an inquiry and the filing of criminal cases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • kirit somaiya
  • Sangli
  • sangli news
  • Scam Case

संबंधित बातम्या

Sangli DPC Members List: सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती; काय आहे नवीन GR?
1

Sangli DPC Members List: सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती; काय आहे नवीन GR?

Sangli Crime:  प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?
2

Sangli Crime: प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे
3

TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.