
Kironotsav at Dagdusheth Halwai Ganapati Temple in Pune
पुणे : जगभरातील भक्तांचे आराध्यस्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी आज (दि.08) महाभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडली आणि पुणेकरांनी हा अद्भूत किरणोत्सव सोहळा अनुभवला. यावेळी उपस्थित भाविकांनी जय गणेश…जय गणेशचा जयघोष केला आहे. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शनिवारी सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभविला. सकाळी ८ वाजून १५ मिनीटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, “गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा गणेशजयंतीनंतर एका आठवडयामध्येच अनुभवता आला’
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या बातम्या मिळवा एका क्लिकवर
पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना शनिवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. यामुळे भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये देखील अनेक भाविक हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमले होते. त्यामुळे पुणेकरांना देखील निसर्गाचा हा चमत्कार पाहता आला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश करत हा महाभिषेक केला.
कोल्हापूरला उत्तरायणातील किरणोत्सव
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्तरायणातील किरणोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला. किरणोत्सव सोहळ्याच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता. मात्र मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहचली होती. मावळीच्या सुर्यकिरणाने अंबाबाई देवीची मूर्तीला पिवळी झळाळी आली होती. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अनेकांनी गर्दी देखील केली होती. किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या किरीटापर्यंत पोहचल्याने यावर्षीच्या किरणोत्सवाला काल प्रथमच सूर्यकिरणांनी देवीच्या किरीटापर्यंत पोहोचत देवीला सोनसळी अभिषेक घातला होता.