Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

नागरिकाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि वापरास सुलभ अशी वेबसाइट यामुळे पुणे शहराने ‘शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांक २०२६’मध्ये ९.०१ गुणांसह आपला ठसा उमटवला आहे.‘वेबसाईट’ या माध्यमात पुण्याने थेट १० पैकी १० गुण मिळवले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 08:39 PM
PUNE NEWS: Pune makes a strong leap in the digital race; City ranks second in e-Governance Index

PUNE NEWS: Pune makes a strong leap in the digital race; City ranks second in e-Governance Index

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: डिजिटल प्रशासनाच्या स्पर्धेत पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नागरिकाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि वापरास सुलभ अशी वेबसाइट यामुळे पुणे शहराने ‘शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांक २०२६’मध्ये ९.०१ गुणांसह ठसा उमटवला. विशेष म्हणजे ‘वेबसाईट’ या माध्यमात पुण्याने थेट १० पैकी १० गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

हेही वाचा : बारामती पंचायत समितीचा सभापती कोण होणार? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ)ने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांचा अधिकृत वेबसाइट, मोबाईल ॲप आणि सोशल मीडिया हँडल्सच्या आधारे १०१ निकषांवर अभ्यास केला. या अहवालात नवी मुंबई (९.११) प्रथम, पुणे दुसरे तर कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र पारदर्शकतेच्या निकषावर पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांनी संयुक्तपणे सर्वोच्च ९.७० गुण मिळवत प्रशासनातील खुल्या पद्धतीचे उदाहरण घालून दिले. ‘सेवा’ या निकषातही पुणे मागे राहिले नाही. मुंबईसह संयुक्तपणे ८.९४ गुण मिळवत शहराने ऑनलाइन सेवांच्या उपलब्धतेत मजबूत स्थान राखले. मोबाईल ॲपच्या बाबतीत ७.७८ गुणांसह पुणे तिसऱ्या क्रमांकावर असून, या क्षेत्रात आणखी सुधारण्याची संधी असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

अहवालातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुणे आणि कोल्हापूर या दोनच महानगरपालिकांनी आपले अंदाजपत्रक ‘एक्सेल’ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. यामुळे आर्थिक माहिती अधिक पारदर्शकपणे नागरिकांसमोर येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अभ्यासादरम्यान बहुतेक शहरांमध्ये मोबाईल ॲप्सकडे तुलनेने कमी लक्ष दिले जात असल्याचे दिसले; मात्र पुण्याची वेबसाइट अत्यंत यूजर-फ्रेंडली असल्याचे विशेष नमूद करण्यात आले. स्क्रीन रीडर, टेक्स्ट रिसाइज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देत शहराने समावेशक डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकले आहे.

हेही वाचा : Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

पीआरओच्या संचालिका नेहा महाजन आणि अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी सांगितले की, ई-गव्हर्नन्समध्ये दरवर्षी सुधारणा होत असली तरी माहिती अद्ययावत ठेवणे, अधिकृत डोमेन वापरणे आणि प्रगत एआय सेवा विकसित करणे ही पुढील टप्प्यातील गरज आहे. पुणे महानगरपालिकेकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद या प्रक्रियेला गती देणारा ठरल्याचे त्यांनी नमूद केले. हा निर्देशांक नागरिकांना policyresearch.in या वेबसाइटवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत पाहता येईल. संपूर्ण अहवाल डाऊनलोड करता येईलच पण सोबत शहरानुसारही अहवाल डाऊनलोड करण्याची सोय आहे.

Web Title: Pune news pune leaps in the digital race city ranks second in e governance index

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • pune news
  • Social Media

संबंधित बातम्या

Asha Bhosle Death : सुरांची आशा हरपली…! आशा भोसले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोककळा; नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली
1

Asha Bhosle Death : सुरांची आशा हरपली…! आशा भोसले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोककळा; नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली

शाळा, महाविद्यालयांत सांस्कृतिक उपक्रमांना नवचैतन्य; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाक्षेत्रांना मिळतोय वाढता प्रतिसाद
2

शाळा, महाविद्यालयांत सांस्कृतिक उपक्रमांना नवचैतन्य; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाक्षेत्रांना मिळतोय वाढता प्रतिसाद

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
3

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध; नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन
4

नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध; नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.