कोल्हापूर/Kolhapur Rain: गेले अनेक दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खूप पाऊस सुरू आहे. राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. तर आजरा तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस सुरू आहे.
आजरा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धुवांधार पाऊस कोसळल्याने पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिरण्यकेशीसह चित्री नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे तर घरांची पडझड सुरू झाली असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते तर शहरांमध्ये सर्वत्र चिखल व पाणी दिसत होते.
पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. तसंच, या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा…
राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. परिणामी कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ६३ टक्के भरलं आहे. जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगे धरणाचा समावेश असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे.