Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे

कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ‘मायक्रो आर्टिस्ट’ अशांत मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यांना आपली कला जागतिक स्तरावर देखील पोहोचवायची आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 02:35 AM
Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे

Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे

Follow Us
Follow Us:

कलेचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख
अशांत मोर यांनी निर्माण केली स्वतःची ओळख
अशांत मोर यांनी साधला ‘नवराष्ट्र’शी संवाद

तेजस भागवत/ पुणे: कोल्हापूरला कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. कलेची विविधता आपल्याला तिथे अनुभवण्यास मिळते. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ‘मायक्रो आर्टिस्ट’ अशांत मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यांना आपली कला जागतिक स्तरावर देखील पोहोचवायची आहे. त्यानिमित्त अशांत मोरे यांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला. यामध्ये त्यांनी या कलेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

अजित पवारांची कलाकृती साकारत असताना तुमच्या भावना काय होत्या?
अशांत:  कोल्हापूर कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मी मायक्रो आर्टिस्ट म्हणून काम करतो. मी तीळ, तांदळावर पेंटिंग केली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाची धक्कादायक बातमी सकाळी कळली. त्यामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला. आपल्या कलेतून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी देखील एक छोटासा प्रयत्न केला. साधारण मी तीन बाय तीन इंचाच्या साईजची पेंटिंग तयार केली.

तुम्हाला या क्षेत्रांमध्ये येण्याची आवड कशी निर्माण झाली?
अशांत:  कोल्हापूरमध्ये अनेक मोठे आर्टिस्ट आहेत. प्रत्येकाची शैली वेगळी आहे. मी काहीतरी वेगळे करून माझे नावे उदयास आणण्यासाठी मी मायक्रो आर्टिस्ट झालो. म्हणजे जिल्ह्यात अजूनपर्यंत मायक्रो आर्टिस्ट कोणी नाहीय. आपल्या बोटाच्या नखांचा आकार असतो, त्या आकाराचे श्री स्वामी समर्थांचे पेटींग तयार केले होते. त्यानंतर मी यामध्ये सातत्याने काम करत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि शाहू महाराज यांचे देखील मी मायक्रो पेंटिंग तयार केलेले आहे.

International Zebra Day 2026: निसर्गाचा ‘कलर कोड’! 31 जानेवारीलाच का साजरा होतो झेब्रा दिन? जाणून घ्या ‘ही’ 5 थक्क करणारी तथ्ये

या सबंधित तुम्ही कोणते शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले का?
अशांत:  मी लहानपणापासूनच कलेचे असे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. जन्मतः असलेली कला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचसोबत मी कोल्हापुरी फेटे बांधण्याची कला देखील जपतोय. मोठमोठ्या रांगोळ्या, संस्कार भारती अशा रांगोळ्या मी करतो, तसेच एक सर्पमित्र म्हणून मी सामाजिक कार्य देखील करत आहे.

कलाकृती तयार करताना कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते?
अशांत: कलाकृती तयार करत असताना संयम अत्यंत महत्वाचा आहे. अनेकावेळा श्वास रोखून सुद्धा कलाकृती तयार करावी लागते. यासाठी लागणारे ब्रश हे स्वतः तयार करावे लागतात. मी स्वतः असे ब्रश तयार केले आहेत. तांदूळ किंवा तीळ यावर तयार केल्या जाणाऱ्या कलाकृती मी भिंग, लेन्स या गोष्टींचा वापर न करता करतो. मी तुळशीच्या, तांदळाच्या खड्यावर विठ्ठलाची कलाकृती तयार केली आहे. शाहू महाराजांचे पेटींग खडूमध्ये कार्व्हिंग करून मी शरद पवारांना भेट दिले होते.

ही कला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आहात?
अशांत: मी जागतिक रेकॉर्ड करण्यासाठी उदबत्तीच्या काडीवर भारतीय संविधान लिहित आहे. त्यामुळे ही कला जागतिक जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. मी टॅटूआर्टिस्ट असून माझ्या स्वतः चा स्टुडिओ आहे. एकदम सूक्ष्म कलाकृती तयार करताना अनेक अडथळे येतात. कलाकृती तयार करताना पूर्ण शांतता लागते. साधारण एक कलाकृती पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो.

Web Title: Mircto artist ashant more tribute to ajit pawar micro painting navarashtra special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • ajit pawar
  • kolhapur
  • navarashtra special

संबंधित बातम्या

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला
1

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला

World Rainforest Day 2026: दर मिनिटाला नष्ट होत आहेत 40 फुटबॉल मैदानाएवढी जंगले; ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ वाचवण्यासाठी आजच व्हा सतर्क
2

World Rainforest Day 2026: दर मिनिटाला नष्ट होत आहेत 40 फुटबॉल मैदानाएवढी जंगले; ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ वाचवण्यासाठी आजच व्हा सतर्क

World Giraffe Day : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगातील सर्वात उंच प्राणी; जाणून घ्या ‘जागतिक जिराफ दिन’ का आहे खास
3

World Giraffe Day : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगातील सर्वात उंच प्राणी; जाणून घ्या ‘जागतिक जिराफ दिन’ का आहे खास

International Yoga Day: PM मोदींच्या ‘त्या’ एका प्रस्तावाने इतिहास रचला! पाहा 177 देशांच्या पाठिंब्याने योग कसा बनला जागतिक उत्सव?
4

International Yoga Day: PM मोदींच्या ‘त्या’ एका प्रस्तावाने इतिहास रचला! पाहा 177 देशांच्या पाठिंब्याने योग कसा बनला जागतिक उत्सव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.