Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : दोन गटातील वाद विकोपाला; तिरडीच्या काठ्यांनी स्मशानभूमीत तुंबळ हाणामारी

पंचगंगा स्मशानभूमीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीसाठी अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्याचा वापर केल्याने स्मशानभूमीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 29, 2025 | 02:38 PM
Kolhapur News : दोन गटातील वाद विकोपाला; तिरडीच्या काठ्यांनी स्मशानभूमीत तुंबळ हाणामारी
Follow Us
Close
Follow Us:
  • दोन गटातील वाद विकोपाला
  • तिरडीच्या काठ्यांनी स्मशानभूमीत तुंबळ हाणामारी
 

कोल्हापूर : कोल्हापुरातील वादाची चांगलीच चर्चा होत आहे. पंचगंगा स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाला वेळ का लावला ? या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारी करताना अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्याचा वापर केल्याने स्मशानभूमीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. यामध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले. विकास रामचंद्र गेजगे, निवास रामचंद्र गेजगे, सुनंदा दगडू बार्शी, पुजा दगडू पारशे अशी जखमींची नावे आहेत. अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे (वय 60) यांचे मंगळवारी निधन झाले. रक्षा सावरण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत गेजगे व पारसे कुटुंब आले होते. यादरम्यान करडे यांचा भाऊ व इतर नातेवाईक उपस्थित होते. यावेळी करडे यांच्या नंदेच्या मुलांनी व इतरांनी तुम्ही रक्षा विसर्जनाला वेळेत का आला नाही अशी विचारणा केली. यावरून हा वाद निर्माण झाला. शब्दाने शब्द वाढत गेल्याने हे प्रकरण हमरी तुमरीवर आले. नंतर दोन्ही गटाकडील लोकांनी स्मशानभूमीत तिरडीसाठी आणलेल्या काठ्या घेऊन एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मशानभूमीत पळापळ सुरू झाली.

Satara News : बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश; सुरक्षेसाठी उपाययोजना जारी

काही काळ तणाव; सीपीआरमध्ये जखमींवर उपचार

अखेर काही नागरिकांनी नातेवाईकांनी सर्वांना शांत केले. दरम्यान निवास गेजगे यांनी वैभव पाटील, शुभम पाटील, निलेश करडे, रेश्मा दत्ता भजनावळे आदींना सर्वांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एकमेकाला जाब विचारण्यावरून ही मारामारी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या सगळ्याची चर्चा जिल्हाभर व्हायला लागली. अंत्यदर्शनासाठी  उपस्थित असलेल्या अनेकांनी यावर टीका केली आहे. झालेला प्रकार अत्यंत गंभीर आणि नींदनीय असून पोलीसांनी मारामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Raigad News: कर्जतमधील रखडलेली विकासकामं लोकप्रतिनिधींचं अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी परिसरात घडली.

  • Que: भांडण कशामुळे झाले?

    Ans: रक्षा विसर्जनाला वेळेत न आल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. साध्या प्रश्नोत्तरातून शब्दाने शब्द वाढत जाऊन हाणामारी झाली.

  • Que: हाणामारीत काय वापरण्यात आले?

    Ans: अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या तिरडीच्या काठ्या उचलून एकमेकांना मारहाण करण्यात आली.

Web Title: Kolhapur news dispute between two groups escalates brawl breaks out in graveyard with sticks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • kolhapur news
  • panchganga river

संबंधित बातम्या

Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले
1

Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले

Sanjay Gaikwad on Audio Clip – गाकवाडांचे निलंबन आणि कारवाई करा, प्रकाशकाच्या पत्नी आणि आईची मागणी
2

Sanjay Gaikwad on Audio Clip – गाकवाडांचे निलंबन आणि कारवाई करा, प्रकाशकाच्या पत्नी आणि आईची मागणी

Kolhapur News : पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर ; दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल
3

Kolhapur News : पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर ; दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल

Kolhapur News : बळीराजा संकटात ; पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा विळखा
4

Kolhapur News : बळीराजा संकटात ; पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा विळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.