चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसाला योग्य पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. संघटनेचे मुख्य नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येत्या रविवारी २५ ॲाक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दराचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि प्रशासनाला इशारा देण्यासाठी काढण्यात येणारी ही रॅली प्रामुख्याने हातकंणगले येथून सकाळी ९ .३० वाजता सुरू करून कुंभोज, नरंदे , वडगांव , वारणाकारखाना,माले ,वाघबीळ , पोर्ले , पडळ , कुंभी कारखाना , महे , परिते , बिद्री कारखाना , वाळवा , खेबवडे , बामणी , सिध्दनेर्ली ,कागलवरून कसबा सांगाव चावडी चौक याठिकाणी सभा घेऊन रॅलीची सांगता करण्यात येणार आहे.या भागातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मोटारसायकलसह या रॅलीत सहभागी होणार असून, ऊस दराच्या मुद्द्यावर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.