
कोल्हापूर : राज्यात ऊस गळीत हंगामाची सुरुवात होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्यावर शेतकऱ्यांचा रोष उसळला आहे. सरकार आणि साखर कारखानदारांनी अपेक्षित दर न जाहीर केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी कोल्हापुरात तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प झाली असून, आंदोलकांनी रस्त्यावर टायर आणि वाहनांना पेटवून दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आणली. जिल्ह्यातील कारखान्यांनी नियंत्रणात अनेक अद्याप एफआरपीप्रमाणे (फेअर अँड रेम्यूनरेटिव्ह प्राइंस) दर देण्याची घोषणा न केल्याने शेतकऱ्यांत असंतोष वाढला होता. बुधवारी सकाळपासूनच शिरोळ, जयसिंगपूर, कागल परिसरात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह रस्थावर उतरत घोषणाबाजी सुरू केली. एफआरपी नको, प्रतिटन हमीभाव हवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा घोषणा देत त्यांनी वाहतूक मार्ग रोखले. तर आंदोलकांनी वाहतूक करणारी वाहनं पेटवून दिल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
शेतकरी संघटनांनी सरकारवर तीव्र निशाणा साधत राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी हातमिळवणी करून शेतकऱ्यांना लुटण्याचा निर्धार सुरू केला आहे. वाढत्या खत, मजुरी आणि वाहतूक खर्चाच्या तुलनेत ऊस दर फारच कमी आहे. सरकारने त्वरित दरवाढ जाहीर केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा ही देण्यात आला.दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांच्या गेटवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही ठिकाणी गठीत प्रक्रियाम्यातआली असून, ऊस तोडणी मजुरांनासावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.या घटनांमुळे शिरोळ, हुपरी येथे वाहतूकठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठात्रास सहन करावा लागला, प्रशासनानेपरिस्थितीचा आढावा घेताण असून,शेतकरी नेते आणि जिल्हाधिका-यांमध्येबैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्व सुरूआहेत. योग्य दराशिवाय ऊस तोड नाही,असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याआंदोलनामुळे गळीत हंगामाच्यासुरुवातीलाच संघर्षाचे वातावरण निर्माणझाले आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेपकरून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलानाही,तर हा रोष राज्यव्यापी आंदोलनातपरिवर्तित होण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दरावरून आंदोलन पेटले आहे. शिरोळ तालुक्यात उसाने भरलेली वाहने पेटवून देण्याचा प्रकार घडला, तर आंदोलन अंकुशकाहून आमदार राजेंद्र पाटील यड़ावकर यांच्या साखर कारखान्यावर सलग दोन दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याचा उसाने भरलेला ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अडवण्यात आला आहे. या दरम्यान स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची संचालकांशी चर्चा झाल्यानंतर वाहने सोडून देण्यात आली.नरदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक सुरू सुरू असताना वाहने अडवण्यात आली. याचवेळी आमदार राहुल आवाडे यांच्या जवाहर सहकारी साखर कारखान्याचा ऊस तोडी सुरू झाल्या असल्याची माहिती समजताच स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी हुपरीपोलिस निरीक्षक-पदाधिकाऱ्यांत झाली जोरदार वादावादी हुपरी येथील मुख्य चौकात वाहने अडकल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी शिरोळ, जयसिंगपूर मार्गावरील केपीटीजवळ ऊसांची वाहने रोखून धरली यावेळी शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.