
Farmers Budget 2026 Live: नारळाची शेती अन्...; बजेटमध्ये शेतीला 'हे' मिळालं, वाचा प्रमुख मुद्दे
५०० एकात्मिक मस्त्य केंद्राची स्थापना
पशुपालन, दुग्धव्यवसायासाठी चालना देणार
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
Union Budget 2026 Live Updates: नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. यामध्ये कृषी, शेतकऱ्यांसाठी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.
बजेटमध्ये शेतीसाठी कोणत्या घोषणा?
1. १ कोटी शेतकरी नारळ शेतीवर अवलंबून, नारळ संशोधनावर अधिक काम करणार
2. ५०० एकात्मिक मस्त्य केंद्राची स्थापना
3. पशुपालन, दुग्धव्यवसायासाठी चालना देणार
4. सागरी किनारपट्टी आणि इशान्यकडील शेतकऱ्यांना मदत करणार
5. काजू, कोकोला जागितक ब्रँड बनविण्याची घोषणा
6. मत्स्यव्यवसायत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी योजना
7. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक पर्याय तपासणार
दुग्धव्यवसाय मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. शेती क्षेत्रात उत्पादन विविधता वाढवणे हे सरकारचे ध्येय असणार आहे. यामुळे रोजगार वाढण्यास मदत होणार आहे. ईशान्य भारतात शेंगदाणे आणि बदाम याचे उत्पादन वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. नारळ उत्पादनात भारत सर्वाधिक मोठा उत्पादक आहे. अनेक कोटी लोकांचे यावर जीवन अवलंबून आहे. नारळ उत्पादक राज्यांमध्ये विशेष कार्यक्रम केले जाणार आहेत. तसेच चंदन लागवडीला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.