
कोल्हापूर : कोल्हापूर येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) कार्यालयास सत्तेत असलेल्या अध्यक्ष व सचिव यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात उपाध्यक्ष धनाजी याकरिता यांनी टाळा ठोकल्याने परत एकदा महामंडळाच्या या कार्यालयात फायटिंग सुरू झाले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती करून राज्य भरातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी चित्रपटाचा झेंडा गौरवला गेला. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते. कोल्हापुरात निर्मित झालेले अनेक मराठी चित्रपट संपूर्ण राज्यभरात थेटरच्या माध्यमातून लावले जात होते. या चित्रपटांना तसेच निर्मात्यांना अनुदान मिळावे, या हेतूने निर्माता-दिग्दर्शक वितरकाच्या अडचणी सोडवण्यात याव्यात, या उद्देशाने कलामहर्षी बाबुराव पेंटर ,आनंदराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर ,चित्रपती व्ही. शांताराम यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना कोल्हापुरात करण्यात आली. त्यामुळे अनेक निर्माते, दिग्दर्शकांना मराठी चित्रपट महामंडळाचा आधार मिळू लागला .