Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Movie Release : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या भावस्पर्शी टॅगलाइनसह आगामी मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एका लहान मुलाची आईसाठीची ओढ आणि गायीशी निर्माण झालेलं मायेचं नातं या चित्रपटातून उलगडणार आहे. मनिष सुरेश शिंदे यांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 14, 2026 | 06:41 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा हा विषय  
  • भावनिक आशय आणि सांस्कृतिक संदर्भ असलेला विषय  
  • गोमातेबद्दलचं प्रेम आणि मायेच्या नात्याची हळवी अनुभूती  
Marathi Movie Release :  आई म्हणजे माया, ममता आणि लेकरासाठी संपूर्ण जग! पण ज्या लेकरासाठी आईचं अस्तित्व हेच त्याचं विश्व असतं, त्याच लेकराला आई हरवल्याची जाणीव झाली तर? आपल्या आईचा शोध घेण्यासाठी होणारी त्याची धडपड, मनातील भावनांचा कल्लोळ आणि एका मुक्या जीवाशी निर्माण झालेलं मायेचं अतूट नातं यांची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन आगामी मराठी चित्रपट ‘धाराऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून एका लहान मुलाच्या निरागस भावविश्वाची आणि गोमातेबद्दलच्या त्याच्या जिव्हाळ्याची झलक पाहायला मिळते. आईच्या मायेची आस आणि एका मुक्या जीवामध्ये आईचं प्रेम शोधणारं बालमन या भावनांमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा हा विषय

भारतीय संस्कृतीत गोमातेला असलेलं श्रद्धेचं स्थान आणि माणूस व प्राणी यांच्यात निर्माण होणारं निस्वार्थ प्रेम यांचा भावनिक वेध ‘धाराऊ’मधून घेण्यात आला आहे. एका लहान मुलाच्या नजरेतून उलगडणारं हे नातं मायेची व्याख्या केवळ रक्ताच्या नात्यांपुरती मर्यादित नसल्याची जाणीव करून देतं. आईच्या प्रेमाची उब अनुभवलेल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा हा विषय प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवण्याची क्षमता बाळगतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना मनात निर्माण होणारा “आई हरवली तर तुम्ही काय कराल?” हा प्रश्न या कथेतील भावनिक गुंतवणूक अधोरेखित करतो.

Chhota Bheem आता रंगमंचावर! मुंबईत 17 ऑक्टोबरला रंगणार पहिला भव्य म्युझिकल शो 

भावनिक आशय आणि सांस्कृतिक संदर्भ असलेला विषय

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष सुरेश शिंदे यांनी केलं आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून भावनिक आशय आणि सांस्कृतिक संदर्भ असलेला विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी केली आहे. कार्यकारी निर्माते अभिषेक शिंदे, मयुर परमार असून एडिटर मंगेश शेळके हे आहेत. वेगळा विषय, भावस्पर्शी नातं आणि गोमातेविषयीची श्रद्धा यांची सांगड घालणारा ‘धाराऊ’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक हळवा अनुभव घेऊन येणार आहे.

गोमातेबद्दलचं प्रेम आणि मायेच्या नात्याची हळवी अनुभूती

‘धाराऊ’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. एका लेकराची आईसाठीची ओढ, गोमातेबद्दलचं प्रेम आणि मायेच्या नात्याची हळवी अनुभूती मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ या भावस्पर्शी टॅगलाइनमधून व्यक्त होणारं नातं प्रेक्षकांच्या मनाला किती भिडणार, याची उत्सुकता आहे.

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!

Web Title: Dharau marathi movie trailer release date october 23 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
  • Entertainmenmt
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

Case No. 99 Marathi Movie: ‘केस नं. ९९’मध्ये नेमकं दडलंय काय? ट्रेलर-पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
1

Case No. 99 Marathi Movie: ‘केस नं. ९९’मध्ये नेमकं दडलंय काय? ट्रेलर-पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.