सिंधुदुर्गनगरी : परराज्यात जाणाऱ्या लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनना सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातील इतर 10 ठिकाणच्या रेल्वे स्थानकांना थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रवाशी संघटनेने तीव्र जनआंदोलन केलं. रेल्वेप्रवासी संघाच्या या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. कोकण रेल्वेच्या खारेपाटण ते मडूरा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे हा या जनआंदोलनाचा मुख्य उद्देश होता. गणेशोत्सावाला काही दिवसच बाकी राहिले असताना चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी दरवर्षी अनेक आव्हानांना समोरं जावं लागतं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग कणकवली कुडाळ सावंतवाडी या चार स्टेशनचे सार्वजनिक बांधकाम च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने कराराच्या माध्यमातून सुशोभीकरण केले. त्यालाही रेल्वे प्रशासनाचा रेल्वेचा विरोध ही खेदाची बाब आहे सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून आर्चीणे रेल्वे स्टेशन यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी ३० लाख रुपये मंजूर केले असल्याचे यावेळी कणकवली संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अन्य रेल्वेच्या सुविधांबाबत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्हाला याही पुढे संघर्ष करावा लागणार हे मात्र तितकेच सत्य आहे कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वे समाविष्ट करा ही महाराष्ट्र सह अन्य राज्यांनीही केंद्र सरकारकडे मागणी नोंदवली आहे. त्यावर केंद्र सरकारने जरूर लक्ष देऊ कोकण रेल्वेच्या या मार्गावरील सर्व गाड्या तसेच स्टेशनचे सुशोभीकरण सुविधा करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी आहे असे विचार आजच्या या जनआंदोलनाच्या वेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.
या मागण्या लक्षात घेत कोकण रेल्वे स्थानकातील समस्या सुधारण्यावर भर दिला जावा, हाच या आंदोलनाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाच्या आवारात जनआंदोलन छेडण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक्सप्रेस गाड्यांना नसलेले थांबे, उपलब्ध न होणारी ऑनलाईन तिकिटे, गणपती सणात उपलब्ध नसलेली तिकिटे, गाड्यांची नसलेली उपलब्धता, निवारा शेड आणि प्रवाशांना रेल्वेस्थानकांवर उपलब्ध नसणाऱ्या सोयीसुविधा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.