Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना धमकी, नंतर घुमजाव; धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी फुलेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 10, 2024 | 12:20 PM
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना धमकी, नंतर घुमजाव; धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान कमालीचे वाढू लागले आहे.  त्यातच भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महीला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिसल्याच त्याचा फोटो काढून व्हिडीओ बनवा, नंतर त्यांची नावे मला पाठवा, मग मी त्या महिलांना धडा शिकवेन, असे वादग्रस्त वक्तव्य  धनंजय महाडिक यांनी केले होते.

महाडिकांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार धनंजय महाडिक हे खुल्या व्यासपीठावरून महिलांना गुंडांप्रमाणे धमकावले जात आहे.  भाजपची खरी रणनीती, चारित्र्य आणि चेहरा याचाच हा पुरावा आहे. भाजप केवळ महिलांचा सन्मान करण्याचे नाटक करत आहे. महिलांना धडा शिकवणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देईल.  अशा शब्दांत काँग्रेसने धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा : Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो

दरम्यान,  विरोधकांनी घेरल्यानंतर महाडिकांंनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात  खूप लोकप्रिय आहे. 2 कोटी 30 लाख महिलांना त्याचा लाभ झाला आहे. माझे म्हणणे असे होते की जर काही महिला काँग्रेससोबत जात असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना लाभ मिळावा म्हणून त्यांची नावे आणि छायाचित्रे काढावीत अशी आमची इच्छा आहे. पण काँग्रेसने ते चुकीच्या पद्धतीने घेतले आणि त्याचा अपप्रचार करत आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गैरसमज पसरवला जातोय

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी फुलेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते या योजनांबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. या अफवांना सर्वसामान्य जनता विसरणार नाही.

खासदार महाडिक म्हणाले की, जाणाऱ्या आमदाराने गेल्या पाच वर्षांत कोणतेही ठोस काम केले नाही. काँग्रेस आमदाराने खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे बदलाची हीच वेळ आहे. त्यामुळे भाजप खासदार अमल महाडिक यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून महायुतीचे सरकार स्थापन करा, असे आवाहनही यावेळी महाडिकांनी केले.

हेही वाचा : ट्रम्पचा ॲरिझोनामध्ये विजय: रिपब्लिकनने सातही स्विंग राज्ये केली काबीज, नवीन आकेडवारी समोर

Web Title: Ladki bahin scheme controversy over dhananjay mahadiks statement nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • Congress
  • Dhananjay Mahadik
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.