Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 03:12 PM
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 'या' तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 'या' तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

Follow Us
Close
Follow Us:
  • पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय
  • चिपळूणमध्ये निवासी शिबिराचे आयोजन
  • बडे नेते राहणार उपस्थित
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे.

 

चिपळूणमधील या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकास कामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

हर्षवर्धन सपकाळांनी सौंदाळा गावाचे केले कौतुक

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील जातमुक्त सौंदाळा गावाला भेट देऊन गावकऱ्यांचे अभिनंदन करत संवाद साधला. सौंदाळा गावाने एकता, समता आणि बंधुभाव यांचा संदेश देत खूप मोठे पाऊल टाकले असून आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती आहे. गाडगेबाबा हे स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक न्याय आणि मानवतेचे प्रबोधन करणारे थोर संत होते. त्यांच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारा हा निर्णय म्हणावा लागेल. अज्ञान, भेदभाव आणि अस्वच्छतेविरुद्ध लढणाऱ्या गाडगे बाबांच्या मार्गावरच सौंदाळा गाव चालत आहे. गढूळ झालेल्या वातावरणात सौंदाळा गावाने तुरटी फिरवण्याचे काम केले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress party has organized a residential camp in chiplun to strengthen the party organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल
2

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.
3

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.

शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा, “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा
4

शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा, “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.