Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पुणे जिल्हा परिषद आता पूर्णपणे काँग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 05:47 PM
पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त
  • पराभवानंतर तालुकास्तरीय दौरे सुरू
  • संघटना बांधणीसाठी जोरदार प्रयत्न
पुणे : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पुणे जिल्हा परिषद आता पूर्णपणे काँग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्येही पक्षाला समाधानकारक यश मिळाले नाही.

 

यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने २६ जागांवर उमेदवार उभे केले होते; मात्र सर्व ठिकाणी पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून १९९९ पर्यंत तब्बल ३८ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. २०१७ च्या निवडणुकीतही पक्षाला ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा शून्यावर घसरल्याने पक्षात आत्मचिंतनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पराभवानंतर संघटना बळकट करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने मोहीम हाती घेतली आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांत संघटनात्मक दौरे सुरू झाले आहेत. या दौऱ्यांदरम्यान तालुका काँग्रेस कमिटींच्या आढावा बैठका घेऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात आहे. सदस्य नोंदणी, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील नियोजन आखले जात आहे.

‘काँग्रेस आपल्या दारी’ या संकल्पनेतून जिल्हा नेतृत्व थेट तालुकास्तरावर पोहोचत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. “संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येत्या काळात काँग्रेस अधिक सक्षम करून तळागाळापर्यंत पोहोचवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

सासवडमध्ये आंदोलन

दरम्यान, केंद्र सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने सासवड येथील शिवतीर्थावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे महासचिव देविदास भन्साळी, दत्ता झुरंगे, राजेंद्र बरकडे, आकाश मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

काँग्रेसचा मोठा निर्णय

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे.

Web Title: Congress failed to win a single seat in the pune zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
1

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ
2

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग
3

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
4

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.