Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘ही योजना कधीही…’

“गुरुवारी उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण पाऊस होता. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी कार्यक्रम पुढे ढकलला. कितीही संकटं आली तरी मोदीजी विकासकामांना ब्रेक देत नाहीत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 29, 2024 | 12:53 PM
'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, 'ही योजना कधीही...'

'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, 'ही योजना कधीही...'

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले, ‘काही लोकं टीका करत आहेत की ही योजना बंद पडेल. पण मी माझ्या लाडक्या बहीणांना सांगू इच्छितो की, ही योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना संसाराला हातभार लावणारी आहे.’

पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन झाले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘विरोधक दोन्ही बाजूंनी टीका करतात. विकासकामं बघून विरोधकांना त्रास होतोय. काही जण विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. विरोधकांना टीका केल्याशिवाय काही काम नाही. दरम्यान, मेट्रोचे भूमिपूजन आणि लोकार्पण हे पंतप्रधानांकडून होतंय ही कौतुकाची बाब आहे. पावसामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून हा कार्यक्रम पुढे ढकलला होता. पण आता हा कार्यक्रम होत आहे’.

तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले, ‘ही योजना कधीही बंद होणार नाही. बहिणींनो, घाबरून जाऊ नका. ही योजना कधीही बंद होणार नाही. त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावं. टीका करणाऱ्या विरोधकांना आता लाडक्या बहीणी जोडा दाखवतील’.

भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन

मेट्रोसह भिडे वाडा स्मारकही होणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पार पडले. याशिवाय, पुरंदरचं विमानतळही लवकर होणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही असा मोबदला द्या. जमीन लवकर अधिग्रहित करा. हे विमानतळ लवकर कार्यान्वित करा. सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

..तरीही मोदीजी विकासकामांना ब्रेक देत नाहीत : एकनाथ शिंदे

“गुरुवारी उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण पाऊस होता. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी कार्यक्रम पुढे ढकलला. कितीही संकटं आली तरी मोदीजी विकासकामांना ब्रेक देत नाहीत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

Web Title: Ladki bahin yojana never been canceled say cm eknath shinde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana
  • Pune Metro

संबंधित बातम्या

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत
1

महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर ‘ही’ बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?
2

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक
3

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.