
लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले...
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जात आहे. असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मोठं विधान केले. ‘लाडकी बहीण योजना’ महिला सक्षमीकरणाची खात्री आहे. ही योजना कधीही बंद केली जाणार नाही. उलट ती आणखी मजबूत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
नागपूरच्या उमरखेड येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची निवडणूक सभा झाली. यामध्ये नगररचना विकास विभाग स्वतःकडे असल्याने उमरेड शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. उमरेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शालिनी सोनटक्के आणि नगरसेवक पदासाठीच्या सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ ही मोठी सभा इतवारी मेन रोड परिसरात झाली.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत
दरम्यान, शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, पक्ष विचारधारा आणि विकास या दोन मुख्य मुद्द्यांवर ठामपणे पुढे जात आहे. उमरेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे गट कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत
शिवसेनेचा विकासाचा अजेंडा आहे. भंडारा व गोंदियाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवा, अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, त्यामुळे भंडारा व गोंदियात परिवर्तनासाठी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे केले.
e-KYC प्रक्रिया वेगाने सुरु
लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. योजनेचा गैरफायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि काही पुरुषांनी घेतल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती. आता ई-केवायसीदरम्यान या शंका अधिक स्पष्ट झाल्या आहेत.
हेदेखील वाचा : तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने ‘लाडक्या बहिणी’चे पैसे घेतले? तर आता ‘ही’ कारवाई होण्याची शक्यता