Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी

नुकतेच राज्य सरकारने १७९६७ महिलांना लाडक्या बहिणीच्या लाभातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 07:34 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरु
  • १७९६७ महिलांना लाडक्या बहिणीच्या लाभातून वगळण्यात आले
  • महिलांमध्ये नाराजी
संगमनेर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्याचे माजी महसूल मंत्री व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालय यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यानंतर या महिलांना या योजनेचा लाभही मिळू लागला होता. मात्र, अलीकडेच सरकारने 17,967 महिलांना या योजनेतून वगळल्याने तालुक्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे, अशी माहिती महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना बालोडे यांनी दिली.

संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जातो. 2024 मध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तालुक्यातील महिलांना मिळावा, यासाठी यशोधन कार्यालयातील यंत्रणेने रात्रंदिवस मेहनत घेऊन सुमारे 90 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला होता. डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांना या योजनेअंतर्गत नियमित लाभ मिळत होता.

पेण तालुक्यात पहिल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन; ‘कृषी तरंग २०२६’ उत्साहात संपन्न

महायुती सरकारने फसवणूक केली, असे महिलांचे मत

निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट, सुरू असलेल्या योजनेतूनच आम्हाला वगळण्यात आले आहे, असा आरोप वडगाव पान येथील शेतकरी महिला मीना थोरात यांनी केला आहे. आम्ही गरीब असतानाही आमच्या नावापुढे ‘सरकारी नोकरी’ असा शेरा पोर्टलवर दिसत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, असा सवाल उपस्थित करत सरकारने गरीब महिलांची फसवणूक केल्याची टीकाही त्यांनी केली.

Prakash Mahajan : “वनमंत्री गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा”, प्रकाश महाजन यांचा टोला

2100 रुपयांचे आश्वासन हवेतच

सरकारने विविध कारणे पुढे करत लाडकी बहीण योजनेतून 17,967 महिलांना वगळले आहे. यासोबतच निवडणुकीपूर्वी दिलेले 2100 रुपयांचे आश्वासन पूर्णपणे हवेत विरले आहे. उलट अनेक महिलांना मिळणाऱ्या रकमेतील कपात करण्यात आली आहे. केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक गरीब महिलांच्या नावापुढे पोर्टलवर ‘सरकारी नोकरी’ असा चुकीचा शेरा दाखवला जात असल्याने पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

फक्त निवडणुकीसाठी घोषणा करून नंतर मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने संगमनेर तालुक्यात सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: More than 17 thousand women excluded from ladki bahin yojna scheme in sangamner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ladki Bahin Yojana
  • Sangamner

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत, विखे पिता-पुत्रांवर केली टीका
1

Ahilyanagar News: सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत, विखे पिता-पुत्रांवर केली टीका

Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी बहिण योजनेवर टिका
2

Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी बहिण योजनेवर टिका

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ
3

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ

“नामांतरानंतर पहिला महापौर भाजपा–राष्ट्रवादी युतीचा करा; 1 महिन्यात ‘हा’ प्रस्ताव मंजूर होईल,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन
4

“नामांतरानंतर पहिला महापौर भाजपा–राष्ट्रवादी युतीचा करा; 1 महिन्यात ‘हा’ प्रस्ताव मंजूर होईल,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.