
लातूर हिरवंगार करण्यात महत्त्वाचा वाटा
हरित स्वप्न साकार करण्यासाठी धडपड
या काळात ग्रीन लातूर वृक्ष टीमने सव्वातीन लाखांहून अधिक लहान मोठ्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. शहर व परिसरात कॅक्टस गार्डन, २५ हजार फुलांचा बगीचा, अमृत उद्यान, अशोक बाग, चाफा गार्डन, ग्रीन आयुर्वेदिक ऑक्सिजन पार्क, १८ घनदाट वनप्रकल्प, ४५ ठिकाणी लहान-मोठी उद्याने उभारण्यात आली आहेत. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याभोवती वृक्षलागवड व सुशोभीकरण, हर्बल गार्डन, हर्बेरियम आणि नक्षत्र उद्यान साकारण्यात आले आहे. शहर सुशोभीकरणासाठी सर्वत्र शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या असून, नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाते. शहरातील जवळपास सर्व रस्ता दुभाजक दर तीन महिन्यांनी स्वच्छ करून त्यावरील झाडांची छाटणी केली जाते.
झाडे लावा झाडे जगवा, आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवा, रस्त्यावर धुंकू नका यासाठी शाळा, महाविद्यालये, कार्यालये, वर्तमानपत्रे आणि विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती केली जात आहे. जलपुनर्भरणासाठी १४ ठिकाणी काम करण्यात आले असून प्लास्टिक निर्मूलनासाठी दुधाच्या पिशव्या आणा-दोन झाडे घ्या उपक्रम, कॅरीबॅगविरहित लातूरसाठी २० हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
सलग पाच वर्षे झाडाचा गणपती, झाडाचा विठ्ठल, वृक्षरूपी लक्ष्मी, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याचे हौद, मैत्रीदिनानिमित्त झाडांना मैत्रीचा धागा, स्मशानभूमी स्वच्छता व बाकड्यांची सुविधा, पोस्टर-फ्री लातूर, धुंकीमुक्त लातूर, हरित घर, इकोनिक्सपासून बाकडे, हर घर नर्सरी, दुर्मिळ झाडे-बियांचे संकलन, ५० हजार तुळशीच्या बियांचे वाटप असे असंख्य उपक्रम राबवले जात आहेत. या सातत्यपूर्ण कार्याचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान
शाळा-महाविद्यालये, स्मशानभूमी-कब्रस्तान, रस्ते दुभाजक, पोलिस ठाणे, न्यायालय, शासकीय कार्यालये, बस व रेलवे स्थानके, वैद्यकीय महाविद्यालये, बाह्यवळण रस्ते तसेच जिल्ह्यातील २५ गावामध्ये वृक्षलागवड व संगोपन सुरू आहे. आज लातूर शहरात असा एकही भाग नाही जिये ग्रीन लातूर वृक्ष टीमचे कार्य पोहोचलेले नाहीं, या कार्याची दखल घेत स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर असंख्य पुरस्कार मिळाले असून अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण वेबसाईटवर या फाउंडेशनच्या कार्याची नियमित नोंद होत आहे.
तापमान २ ते ३ अंशांनी तापमानात घट झाल्याने दिलासा
मागील दोन उन्हाळ्यात लातूर शहराचे तापमान २ ते ३ अंशांनी कमी झाले, हवेची गुणवता सुचारली, भूजलपातळी वाढली आणि पक्ष्यांची संख्या वाढली, पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारच्या अहवालानुसार में २०२४ मध्ये लातूर शहराची भारतातील स्वच्छ हवेच्या शहरांमध्ये नोंद झाली. वृक्षतोडीविरोधात ग्रीन लातूर वृक्ष टीमने डॉक खाली पाय वर आंदोलन, काळ्या रिबिनी-मास्कसह निषेध नोंदविला.
‘महायुती सरकार लाडकं नव्हे तर लबाड…’, विलासराव देशमुखांच्या लेकाने लातूरमध्ये गाजवली सभा