पीक पाहणीच्या कामावरून सुरू झालेला वाद थेट तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाणीपर्यंत पोहोचला. चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथे घडलेल्या या प्रकारानंतर तलाठी संघ आक्रमक झाला असून, दोषीला अटक न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाअभावी खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे तलावांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने अनेक तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात 'एल निनो' परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पावसात घट होण्याची शक्यता आहे. कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येक पाझर तलाव व बंधाऱ्यासाठी विशेष योजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केळगाव (ता. निलंगा) येथील भाऊराव निवृत्ती राठोडकर (वय ८५) आणि त्यांचे सख्खे भाऊ माणिक निवृत्ती राठोडकर (वय ८२) यांचे शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) एकाच दिवशी निधन झाले. एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने राठोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ग्रामीण भागातील विविध विकासकामांमधील अडचणी त्वरित दूर करून विकासाला गती द्यावी, अशी मागणी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
CBSE School: लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी आणि सचिवपदी रमेशचंद्र बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल ‘माध्यम’ सांस्कृतिक व सामाजिक विचारपीठाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी लातूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २६, लेबर कॉलनी येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी केला.
लातूर काँग्रेस भवन समोर होणाऱ्या भाजपाच्या नियोजित आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या आंदोलनापूर्वीच काँग्रेस भवन समोर पतीत पावन आंदोलन सुरू केले. तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी निषेध आंदोलन केले.
अहमदपूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. अहमदपूर येथे पाटील बोलत होते.
स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळून 'मयत' यादीत टाकण्यात आल्याचा दावा चाकूर काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन (पप्पुभाई) रज्जाक शेख यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे २.१० लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.