Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Municipal Corporation: बजेट अडकले, विकास ठप्प? लातूर महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान

लातूर-आज पासून होळीचा महिना सुरू झाला. होळी पेटवताना लोक जी 'कृती' करतात, ती करण्याची पाळी लातूरच्या नागरिकांवर येणार की काय, अशी शंका भेडसावू लागली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 01, 2026 | 10:35 PM
Latur Municipal corporation: अजेंडातील त्रुटींवरून लातूर मनपात तणाव; सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनावर हल्लाबोल

Latur Municipal corporation: अजेंडातील त्रुटींवरून लातूर मनपात तणाव; सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनावर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:
  • मनपाचे अंदाजपत्रक हवेतच लटकले
  • विकासकामांवर ब्रेकची शक्यता
  • सभागृह निवडणूक न झाल्याने बजेट अपूर्ण
 

Latur Municipal Corporation: लातूर-आज पासून होळीचा महिना सुरू झाला. होळी पेटवताना लोक जी ‘कृती’ करतात, ती करण्याची पाळी लातूरच्या नागरिकांवर येणार की काय, अशी शंका भेडसावू लागली आहे. मार्च म्हणजे साधारणतः अंदाजपत्रकांचा महिना. त्यामुळे लातूर महानगरपालिकेचे बजेट ३१ मार्च २०२६ पूर्वी सादर झाले पाहिजे व सभागृहाने ३१ च्या आत ते मंजूरही केले पाहिजे. परंतु तांत्रिक दृष्ट्या तसे होण्याची शक्यता दिसत नाही. ३१ मार्च च्या आत बजेट मंजूर न झाल्यास पुढच्या वर्षीच्या मनपाच्या खर्चाला ब्रेक बसणार आहे.

अंदाजपत्रक मंजुरीला वेळच नाही; अमलबजावणी कशी होणार ?
नियमाप्रमाणे लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीच्या सभापतींकडे ते द्यावे लागते. सभापतींनी त्या बजेटच्या कॉपीज तयार करून स्थायीच्या सोळा सभासदांच्या कडे पाठवावे लागते. या सदस्यांनी त्या बजेटवर पंधरा दिवस विचार विनिमय करून पंधराव्या किंवा सोळाव्या दिवशी स्थायी समितीच्या सूचनांसह तो अहवाल महापौरांकडे सोपवावा लागतो. महापौरांनी त्याच्या नोटीसा काढून मग तो प्रथेप्रमाणे बॅगांमध्ये ठेवून 70 नगरसेवकांकडे द्यावा लागेल.

सर्व नगरसेवकांनी त्याचा पंधरा दिवसांच्या मुदतीत अभ्यास करून नंतर सभागृहात सादर करून मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर कोठे अंदाजपत्रकाचे प्रसिद्धीकरण करावे लागते. ही सगळी प्रक्रिया खरे तर, ३१ मार्च २०२६ पूर्वी पार पडून १ एप्रिल २०२६ पासून बजेटची अंमलबजावणी होऊ शकते. या सगळ्या प्रक्रियेला साधारणपणे दीड महिना लागेल. मग ३१ मार्च च्या आत लातूर मनपाचे बजेट सादर होणार कसे ?

सभागृह निवडणूक राहिली प्रलंबित
आता यात पुन्हा गंमत अशी आहे की, लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायीचे सभागृहच अजून पर्यंत निवडले गेलेले नाही. ते निवडले गेल्यानंतरच स्थायी समितीचे सभापतीपद आणि समिती अस्तित्वात येईल ना ! मुळात अजून पर्यंत स्थायी मुळात अजून समितीचाच पत्ता नसल्याने तयार झालेले (किंवा अजूनपर्यंत तयारही न झालेले ) बजेट त्रिशंकू अवस्थेत हवेतच हेलकावे घेत बसले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Latur municipal corporations budget is in a state of limbo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.