लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळी बागेची, तर नायगाव येथे पाणंद रस्त्याच्या कामाची पाहणी करत त्यांनी शेतकरी आणि मजुरांशी संवाद साधला. यावेळी पाणीटंचाई, चारा टंचाई, पीक नुकसान आणि रोजगाराच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ 51.2 टक्के पाऊस झाला असून, 142 प्रकल्पांमध्ये अवघा 10.10 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. भूजल पुनर्भरण आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना राज्यपालांनी प्रशासनाला दिल्या.