Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरची शांतता कायदा-सुव्यवस्था धोक्यात; डॉ. नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली चिंता

रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्यातील समन्वय वाढवावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2025 | 09:49 AM
कोल्हापूरची शांतता कायदा-सुव्यवस्था धोक्यात; डॉ. नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली चिंता

कोल्हापूरची शांतता कायदा-सुव्यवस्था धोक्यात; डॉ. नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली चिंता

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात अलीकडील काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी डॉ. गोऱ्हे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी, नागरिकांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.

अलीकडे कोल्हापूर शहरात झालेल्या हल्ले, खून, खुनाचे प्रयत्न व तलवारीने दहशत माजविणाऱ्या घटना ही चिंतेची बाब असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी सर्व आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी ग्रामीण भागातील सुरक्षेवरही लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक वातावरण टिकवण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या तक्रारींवर जलद व प्रभावी प्रतिसाद मिळावा यासाठी भरोसा सेल अधिक व्यापक आणि कार्यक्षम करण्यावर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला. महिलांसोबत ऑनलाईन कनेक्टिव्हिटी वाढवणे, सूचना पेट्यांचा वापर सुयोग्य रीतीने करणे तसेच पोलिसांना लिंगभाव संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्यातील समन्वय वाढवावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली. निर्जन रस्त्यांवर गस्त वाढवणे, ग्रामीण भागात रिक्षा नंबर नोंदविण्याबाबत जनजागृती करणे या उपाययोजना तातडीने राबवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमली पदार्थांची विक्री, टोळीबाजी, खून व खुनाचे प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया अधिक काटेकोरपणे राबवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. सीसीटीव्ही नेटवर्क अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेणे हे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, जिल्ह्यातील पोक्सो प्रकरणांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने, या प्रकरणांची सुनावणी लवकरात लवकर व्हावी आणि तारखांचा नियमित पाठपुरावा व्हावा यासाठी विशेष पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कोल्हापूर ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची नगरी

कोल्हापूर ही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची नगरी असून, येथे शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणे अस्वीकार्य असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. नागरिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस व तातडीची कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Law and order is in danger situation dr neelam gorhe expressed concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • dr. Neelam Gorhe
  • kolhapur news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
3

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
4

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.