

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंर नवीन शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis governmet) अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. त्यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. (Special Adhivshan) यात सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांची निवड करण्यात आली. (Assembly Speaker and Leader of Opposition in the Assembly) विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद (Leader of the Opposition in the Legislative Council) कोणाकडे जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पदावर शिवसेनेने दावा केलेला असतानाच काँग्रेसने देखील हे पद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिघेही इच्छुक आहेत. विधान परिषदेत शिवसेनेचे ११ आमदार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १० आमदार आहेत. शिवसेनेकडून अद्याप नाव समोर आलेले नाही. पण आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज या पदासाठी काँग्रेस इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अन्य पक्षांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी कायम राहिल्यास अन्य तीन आमदारांसह ३४ आमदारांचे पाठबळ आहे. तर, भाजपाकडे एकूण २८ आमदार आहेत. राज्यपाल नामनियुक्त १२ जागांसह इतर ४ जागा रिक्त आहेत. त्यामुळं आगामी काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची वर्णी लागते हे येणारा काळच ठरवेल.