Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेने बिबट्या जागीच ठार! अकोला-हैदराबाद महामार्गावरील सावरगाव नजीकची घटना

अकोला–हैदराबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन बिबट्यांना जबर धक्का बसून एक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 25, 2025 | 07:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेक वन्य प्राणी मुक्तपणे वावरताना दिसतात
  • वाहनाचा वेग इतका प्रचंड की बिबट्याचा जागीच मृत्यू
  • पंचनामा करून मृत बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला
अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. 23) मध्यरात्री भीषण अपघातात दोन बिबट्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एक बिबट जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (दि. 24) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वाशिम तालुक्यातील सावरगाव परिसर वनक्षेत्राला लागून असल्याने येथे अनेक वन्य प्राणी मुक्तपणे वावरताना दिसतात. मध्यरात्री दोन बिबट रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वाहनाचा वेग इतका प्रचंड होता की एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या बिबट्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली.

Maharashtra News : शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांची तपासणी; ५०६२ उमेदवारांची उपस्थिती तर २४६ अनुपस्थित

सोमवारी सकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना येताच परिसरात लोकांची गर्दी झाली. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला उडालेल्या खुणा आणि रक्ताचे डाग पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जंगलाच्या पट्ट्यातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार वेगमर्यादा न पाळल्याने वन्य प्राण्यांना धोका वाढत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृत बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तर गंभीर जखमी बिबट्याला उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. जखमी प्राण्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर कायम असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी वेग नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, रात्रीच्या वेळी महामार्गावर वेगमर्यादा सातत्याने मोडली जात असल्याने अशा दुर्घटना वाढत आहेत. वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने या मार्गावर स्पीड कंट्रोल, वॉर्निंग साईन बोर्ड, रिफ्लेक्टर झोन, तसेच रात्री गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Washim: फटका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; सुनावणीकडे लक्ष… ५०% मर्यादा ओलांडल्याने चिंता वाढली 

घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि रस्ते सुरक्षा या दोन्ही गोष्टींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वन विभागाने या अपघातातील वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांची नोंद आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहनाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अमानवी धडकेत एक बिबट्याचा मृत्यू आणि दुसऱ्या बिबट्याचे गंभीर जखमी होणे ही दुर्दैवी घटना असून, जंगलजवळील मार्गांवर वन्यजीव संरक्षणासाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Web Title: Leopard killed on the spot after being hit by a speeding vehicle on a busy road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 07:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.