Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्याच्या लिंगदेव यात्रेचा विक्रमी लिलाव! संगीत आखाडीसाठी १६ लाखांहून अधिकची बोली, देश-विदेशातील भूमिपुत्रांचा सहभाग

गुढीपाडव्याच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे होणाऱ्या पारंपरिक संगीत आखाडी यात्रेच्या लिलावाने यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला. आखाडीतील सोंगांच्या मानासाठी तब्बल १६ लाखांहून अधिकची बोली लावण्यात आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 12:36 PM
गुढीपाडव्याच्या लिंगदेव यात्रेचा विक्रमी लिलाव! संगीत आखाडीसाठी १६ लाखांहून अधिकची बोली, देश-विदेशातील भूमिपुत्रांचा सहभाग

गुढीपाडव्याच्या लिंगदेव यात्रेचा विक्रमी लिलाव! संगीत आखाडीसाठी १६ लाखांहून अधिकची बोली, देश-विदेशातील भूमिपुत्रांचा सहभाग

Follow Us
Close
Follow Us:
  • लिंगदेव येथे गुढीपाडव्याच्या पारंपरिक संगीत आखाडी यात्रेच्या लिलावात यंदा १६ लाखांहून अधिक बोली लागून विक्रम झाला.
  • देश-विदेशात असलेल्या गावातील भूमिपुत्रांनीही ऑनलाइन प्रक्षेपणाद्वारे लिलावात सहभाग घेतला.
  • यात्रेनिमित्त कुस्ती हंगामा व तालुकास्तरीय लेझीम स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील लिंगदेव येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या पारंपरिक संगीत आखाडी यात्रेच्या लिलावाने यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १६ लाखांहून अधिक रकमेवर बोली लागल्याने या यात्रेची परंपरा आणि गावकऱ्यांचा उत्साह पुन्हा एकदा अधोरेखित झाला. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उत्सव दरवर्षी भगवान लिंगेश्वर मंदिर, लिंगदेव येथे उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडणाऱ्या या पारंपरिक आखाडीत गावातील ग्रामस्थ रामायण व महाभारतातील विविध पात्रांची सोंगे घेऊन नृत्य सादर करतात. या सोंगांच्या मानासाठी दरवर्षी लिलाव घेतला जाती. या लिलावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील भूमिपुत्रांनाच सोंगांचा मान घेण्याची संधी दिली जाते, त्यामुळे परंपरेचे जतन होत आहे.

५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; जळगावमध्ये अपघाताची बनावट स्क्रिप्ट, डॉक्टरांसह ९ जण अटकेत

भाविकांकडून यात्रेची तयारी अंतिम टप्यात

गुढीपाडव्याच्या यात्रेसाठी गावात मोठी लगबग सुरू झाली आहे. घरांची रंगरंगोटी, शेतातील कामे, पाहुण्यांना निमंत्रणे तसेव नव्या वाहनांची खरेदी सुरू आहे. ग्रामपंचायतीमार्फत रस्ते, स्वच्छता व दिवाबत्तीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत, गावातील दुकानदारही गुढीशेव व रेवडी तयार करण्यात व्यस्त आहेत.

यांनी दिली सर्व माहिती

अशी माहिती लिगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डी. बी. फापाळे, उपाध्यक्ष दत्तु कानवडे, सचिव पंढरीनाथ जाधव तसेच विश्वस्त रामकृष्ण कानवडे, दत्तु फापाळे, सदाशिव कानवडे, सुरेश कानवडे, एकनाथ कोरहे, एकनाथ कानवडे, सुदाम हांडे, भाऊसाहेब हाडवळे, भाऊसाहेब पवार, हरिभाऊ फापाळे, बाळशिराम आढाव, निवृत्ती आबरे, उत्तम हाडवळे, बन्सी कानवडे, सुनील शहा, कैलास फापाळे व व्यवस्थापक प्रवीण सौळसे यानी दिली.

लिंगेश्वर सभामंडपात झाले प्रमुख मानांचे लिलाव

भगवान लिंगेश्वर सभामंडपात झालेल्या या लिलावावे माईकद्वारे पुकार करण्यात आले. तसंच आवाज सह्याद्रीचा लाईव्ह चैनलद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देश-विदेशात नोकरी, व्यवसाय व सैन्य सेवेत असलेल्या गावातील भूमिपुत्रानाही लिलावात सहभागी होता आले. त्यामुळे यंदाचा लिलाव दरवषीपेक्षा अधिक रकमेवर जाऊन विक्रमी ठरला. यात्रेच्या लिलावाची सुरुवात भगवान लिंगेश्वर नंदादीप (५६ किलो तेल) या मानाने झाली. हा मान युवा उद्योजक प्रमोद भाऊसाहेब पवार यांनी ६६ हजार रुपये देऊन पटकावला.

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

कुस्ती आणि लेझीम स्पर्धांचे आयोजन

यात्रेनिमित्त भव्य कुस्ती हंगामा आयोजित करण्यात आला असून प्रथम पारितोषिक २६.१५१ रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच अकोले आणि संगमनेर तालुकास्तरीय लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम ५,१५१ रुपये, द्वितीय ४.१५१ रुपये व तृतीय ३,१५१ रुपये बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातून शिवभक्त या व्यात्रेला उपस्थित राहत असतात. मागील काही वर्षांपासून परदेशातील पाहुणेही या उत्सवाला हजेरी लावत असल्याने लिंगदेव यात्रेची कीर्ती देशाबरोबरच विदेशातही पोहोचत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Lingdev yatra mahalingdev yatra gudi padwa record auction 16 lakh bid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Gudi Padwa
  • Religious Places
  • Yatra News

संबंधित बातम्या

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
1

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव
2

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा
3

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात
4

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.