Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune  Disaster Management: टाटा धरणातील गाळ काढणार ; लोणावळ्यात पूर टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना

Lonavala News : शहरातील अनेक नाल्यांवर झालेली अतिक्रमणे आणि नाले अरुंद केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाले मोकळे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 06:00 PM
Lonavala News, Sunil Shelke, Maval Rain, Pune Flood, Maharashtra Monsoon Relief

Lonavala News, Sunil Shelke, Maval Rain, Pune Flood, Maharashtra Monsoon Relief

Follow Us
Follow Us:

Pune  Disaster Management: पूरबाधित नागरिकांना तातडीची मदत, नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे, नाल्यांवरील अतिक्रमणे हटविणे तसेच भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लोणावळा शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा तातडीने निपटारा करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी नगरपरिषद सभागृहात प्रशासनाची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

बैठकीला महसूल, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, टाटा प्रकल्पाचे अधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरबाधित कुटुंबांना टाटा कंपनीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा, अशा सूचना आमदार शेळके यांनी दिल्या. तसेच टाटा धरणातील गाळ काढून खोलीकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

पूरामुळे नुकसान झालेल्या घरांचे वस्तुनिष्ठ पंचनामे उद्यापासून महसूल व नगरपरिषद प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पात्र नागरिकांना शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

शहरातील अनेक नाल्यांवर झालेली अतिक्रमणे आणि नाले अरुंद केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाले मोकळे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. पूरस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविणे, नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या निर्णयांमुळे ही बैठक लोणावळा शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

चौकट-सर्वतोपरी मदत उपलब्ध करू

बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. बाधित कुटुंबांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना आवश्यकतेनुसार अन्नधान्य किट, जीवनावश्यक वस्तू आणि इतर सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

नगरपरिषदेत आपल्या समस्या मांडण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे समाधान करण्याचाही प्रयत्न आमदार शेळके यांनी केला. “लोणावळ्यातील एकाही पूरग्रस्त नागरिकाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. या संकटाच्या काळात मी आणि संपूर्ण प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Web Title: Lonavala heavy rain tata dam desiltation encroachment removal action plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Lonavala news
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल
1

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.