LPG Price Today: महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे दर काय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
महाराष्ट्रात शहर बदलले की LPGचा दरही थोडा वेगळा दिसतो. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर 941.50 इतका आहे, तर पुण्यात 945 आणि नाशिकमध्ये 945.50 आहे. कोल्हापूर व सांगली येथे हा दर 944.50 आहे. रायगडमध्ये 952.50, ठाण्यात 941.50 आणि जळगावमध्ये 947.50 अशी किंमत आहे. LPG Price Today:
विदर्भातील काही भागात मात्र दर तुलनेने जास्त आहेत. नागपूरमध्ये घरगुती सिलेंडरसाठी 993.50, भंडाऱ्यात 1,002 आणि गडचिरोलीत 1,011.50 मोजावे लागतात. गोंदियात ₹1,010.50, चंद्रपूरमध्ये 990.50, तर यवतमाळमध्ये ₹983.50 असा भाव आहे.
इतर शहरांचा विचार केला तर अहमदनगरमध्ये 955.50, अकोला ₹962, अमरावती 975.50, छत्रपती संभाजीनगर 950.50, बीड 967.50 आणि बुलढाणा 956.50 आहे. धुळे 962, हिंगोली 967.50, जालना 950.50, लातूर 966.50, नांदेड 967.50 आणि परभणी 968 असा दर आहे.
हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या सिलेंडरचा दर घरगुती गॅसपेक्षा वेगळा असतो. ऑगस्टच्या सुरुवातीला या सिलेंडरच्या किमतीत चांगली घट करण्यात आली होती. त्यामुळे व्यावसायिकांना इंधनाच्या खर्चात काहीसा दिलासा मिळाला.
सध्या मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2,691.50, पुण्यात 2,752 आणि ठाण्यात 2,693 आहे. नागपूरमध्ये 2,915.50, नाशिकमध्ये 2,767 आणि रायगडमध्ये 2,717.50 असा भाव आहे. गडचिरोलीत हा दर 2,941.50 असून भंडाऱ्यात 2,927 आहे.
पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी
पाइपने घरात पोहोचणाऱ्या PNG गॅसच्या दरातही आज बदल झालेला नाही. मुंबई, रायगड आणि ठाणे येथे PNGचा दर 51.50 आहे. पुण्यात ₹51, नाशिकमध्ये ₹50.25, कोल्हापूरमध्ये ₹49.82 आणि नागपूरमध्ये 48.30 असा भाव आहे. लातूर, उस्मानाबाद आणि रत्नागिरीमध्ये PNG 45.50 प्रति युनिट उपलब्ध आहे. गॅस बुक करण्यापूर्वी आपल्या भागातील ताजा दर एकदा तपासणे चांगले. कारण LPG आणि PNGच्या किमती शहरानुसार तसेच वेळेनुसार बदलू शकतात.






