फोटो सौजन्य सोशल मीडिया
पहिल्याच दिवशी खासदार डॉ. शिंदे यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन खासदार ड़ॉ. शिंदे यांनी मास्टर्सच्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली. या अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी करण्याचा संकल्प खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केला.
डॉ. आंबेडकरांचे “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पितो तो गर्जना करतो” हे विचार आठवत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहिल्यानंतर या विचारांचा अर्थ अधिक प्रकर्षाने जाणवतो, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील खासदार म्हणून नव्हे, तर सर्वप्रथम एक विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी उभे राहिल्याचा अभिमान वाटल्याचे त्यांनी म्हटले. विचार आणि निर्धार किती दूरवर प्रवास करू शकतात, याची जाणीव या प्रसंगातून झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ही आपली दुसरी पदव्युत्तर पदवी असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. एम.एस. ऑर्थोपेडिक केल्यानंतर वैद्यकशास्त्राने उपचार कसे करायचे हे शिकवले; आता गुंतागुंतीच्या आर्थिक प्रश्नांना आणि धोरणांना कसे सामोरे जायचे, हे समजून घेण्यासाठी त्यांनी या अभ्यासक्रमाची निवड केली आहे.
क्षेत्र वेगळे असले तरी शिकण्याची आणि जाणून घेण्याची जिज्ञासा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुन्हा व्याख्याने, गटचर्चा आणि कॉलेजच्या दिवसांसारखी धावपळ अनुभवता येणार असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. हे शिक्षण महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची उत्सुकता असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांनी पदवी, नोकरी किंवा पद मिळाल्यानंतर शिक्षण संपले असे कधीही समजू नये, असा संदेशही त्यांनी दिला. “मनाची जोपासना हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे” या डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत, जग वेगाने बदलत असल्याने जिज्ञासू राहा आणि सतत शिकत राहा, असा सल्ला त्यांनी ‘जेन झी’ला दिला.