
-पशुपालक शेतकरी धास्तावले
कवठे येमाई परिसरात बिबट्यांची प्रचंड दहशत असल्याने त्यांच्या तावडीत जनावरे सापडू नयेत म्हणून शेतकरी विविध संरक्षणात्मक उपाय योजना करण्यात व्यस्त असतानाच या भागात जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराने शिरकाव करीत सुमारे ५० जनावरांना लागण झाल्याने अनेक पशुपालक,गोपालक शेतकरी धास्तावले आहेत. त्यातच मागील एक महिन्यात परिसरात तीन जनावरे या आजाराने दगावल्याची बाब चिंता वाढविणारी आहे.आपल्या जनावरांना हा आजार जडू नये म्हणून शेतकऱयांनी आपल्या जनावरांची अधिकाधिक काळजी व सुरक्षितता घेण्याचे आवाहन ही डॉ. मुने यांनी केले आहे